जाहिरात

Commonwealth Games 2026: फक्त नीरज चोप्राच नाही! 'हे' दिग्गज खेळाडूही भारताला मिळवून देणार गोल्ड मेडल

Commonwealth Games 2026: कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताची मदार फक्त नीरज चोप्रावरच असणार नाही, तर इतर अनेक खेळाडूही गोल्ड मेडलचे प्रबळ दावेदार आहेत.

Commonwealth Games 2026: फक्त नीरज चोप्राच नाही! 'हे' दिग्गज खेळाडूही भारताला मिळवून देणार गोल्ड मेडल
Neeraj Chopra : कॉमनवेल्थ गेम्समध्ये नीरज चोप्रा हा भारताकडून गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार आहे.
मुंबई:

Commonwealth Games 2026:कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारताची मदार फक्त नीरज चोप्रावरच असणार नाही, तर इतर अनेक खेळाडूही गोल्ड मेडलचे प्रबळ दावेदार आहेत. गुरुवारी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे या स्पर्धांना सुरुवात होत असून भारताचे 126 ॲथलीट्स यात सहभागी होत आहेत. यावेळी कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी आणि टेबल टेनिस या खेळांचा समावेश नसल्यामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या गेल्या वेळच्या 61 पदकांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. तरीही ॲथलेटिक्स, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग यांसारख्या मुख्य खेळांमध्ये भारताने मजबूत संघ उतरवला आहे.

या स्पर्धेत कोणते भारतीय खेळाडू गोल्ड मेडल पटाकवू शकतात ते पाहूया...

नीरज चोप्रा (भालाफेक)

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा 32 सदस्यांच्या ॲथलेटिक्स संघाचे नेतृत्व करेल. पाठीच्या दुखापतीतून सावरून त्याने दोहा डायमंड लीगमध्ये पुनरागमन केले. त्या स्पर्धेत नीरजनं 85.69 मीटर लांब भाला फेकत चौथे स्थान मिळवले. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरजने 2018 च्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले होते, मात्र 2022 च्या बर्मिंगहॅम स्पर्धेत तो खेळू शकला नव्हता.

( नक्की वाचा : Rohit Sharma: 'मला हेच सांगण्यात आलंय...' निवृत्तीच्या चर्चेवर रोहित शर्माने दिलं थेट उत्तर, पाहा VIDEO )
 

मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग)

उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाची ध्वजधारक असणारी मीराबाई चानू ही भारताची सर्वात मोठी पदकदावेदार आहे. 31 वर्षीय मीराबाईने 2018 आणि 2022 अशा दोन्ही राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल  जिंकले आहे. ग्लासगोमध्ये ती महिलांच्या 48 किलो वजनी गटात मैदानात उतरेल.

लव्हलिना बोर्गोहाईन (बॉक्सिंग)

माजी जागतिक आणि आशियाई चॅम्पियन लव्हलिना बोर्गोहाईन हिचे हे पहिले राष्ट्रकुल गोल्ड मेडल मिळवण्याचे स्वप्न असेल. 2018 आणि 2022 मध्ये पदकाने हुलकावणी दिल्यानंतर, 28 वर्षीय लव्हलिना यावेळी महिलांच्या 75 किलो बॉक्सिंग प्रकारात खेळणार आहे.

( नक्की वाचा : Kolhapur News: कोल्हापुरात साकारणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; राज्य सरकारची मंजुरी, वाचा सर्व प्लॅन)

मुरली श्रीशंकर (लांब उडी)

चार वर्षांपूर्वी बर्मिंगहॅममध्ये रौप्यपदक जिंकणारा मुरली श्रीशंकर सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या महिन्यात भुवनेश्वर येथे झालेल्या इंटर-स्टेट चॅम्पियनशिपमध्ये त्याने 8.38 मीटर लांब उडी मारून आपल्या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली आहे.

लॉन बॉल्स (महिला आणि पुरुष संघ)

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या लॉन बॉल्स संघाने ऐतिहासिक कामगिरी केली होती. महिलांच्या संघाने सुवर्ण तर पुरुषांच्या संघाने रौप्यपदक पटकावले होते. या दोन्ही संघांकडून यंदाही गोल्ड मेडलची मोठी अपेक्षा आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com