झंडु कुमार हे नाव प्रत्येक भारतीय आता कधी विसरणार नाही. या नावावरून एक वेळ हिणवलं जात होते. तेच नाव आता अभिमानाने घेतलं जाईल. त्याला कारण ही तसेच आहे. झंडु कुमार याने साता समुद्रा पार भारताचा तिरंगा फडकवला आहे. त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत म्हणजेच Commonwealth Games मध्ये भारताला पदक मिळवून दिलं आहे. झंडुचा संघर्ष ते पदकाला गवसणी हा प्रवास अंगावर काटा आणणाराच आहे. त्याने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात क्लांस्य पदक पटकावले आहे.
झंडू कुमारचे आई-वडील आज ही गावात भाजी विकतात. त्यांच्या या भाजीच्या दुकानात झंडू मदत करत होता. पण त्यातून खर्च भागत नव्हता. त्यामुळे झंडून ई रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. डाइट आणि सप्लीमेंट्सचा खर्च भागवण्यासाठी त्याने आठ ते नऊ महिने ई-रिक्षा चालवली. शारीरिक दिव्यांगत्वामुळे ब्रेक दाबताना होणाऱ्या वेदना सहन करत त्याने जिमचा खर्च भागवला. तो जीममध्ये असताना त्याला बिहारचे प्रशिक्षक कुंदन पांडे यांनी पाहीले. तो जास्त वजन उचलत असल्याचं त्यांनी पाहीलं. त्यानंतर त्यांनी त्याला पॅरा पॉवरलिफ्टिंगकडे वळवले.
त्यानंतर त्याने माग वळून पाहीले नाही. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर बिहारच्या या 28 वर्षीय झंडू कुमार याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2026) इतिहास रचला आहे. पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात झंडू कुमारने 181 आणि 190 किलो वजन यशस्वीपणे उचलले. त्यातून त्याने 130.9 गुण पटकावले. यासह त्याने कांस्यपदकावर आपले नाव कोरले. हे पदक केवळ क्रीडा क्षेत्रातील यश नसून, बालपणापासून झेललेल्या अवहेलनेला आणि दारिद्र्याला दिलेले सडेतोड उत्तर आहे.
वयाच्या पाचव्या वर्षी पोलिओचा झटका आल्याने झंडू कुमारचे पाय निकामी झाले. त्याच्या उपचारांवर कुटुंबाची सर्व जमापुंजी खर्च झाली. या आर्थिक ओढाताणीमुळे वडिलांच्या मित्रांनी त्याला झंडू असं नाव पाडलं होतं. हेच नाव पुढे त्याची ओळख बनले. त्याने एकदा नाव बदलून 'अविनाश' करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच वेळी सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याच्या जुन्या नावावरून त्याची हसून टवाळी केली. त्या दिवशी झंडूने या टवाळीचाच आपली ढाल बनवले. त्यानंतर त्याने हेच नाव अधिकृत दस्तऐवजांवर कायम ठेवले.
( नक्की वाचा : Rohit Sharma: 'मला हेच सांगण्यात आलंय...' निवृत्तीच्या चर्चेवर रोहित शर्माने दिलं थेट उत्तर, पाहा VIDEO )
त्याने 2022 च्या राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकायचे असं त्याने ठरवले होते. त्याचा आत्मविश्वास वाढला होता. पुढे तो गांधीनगर येथील साई (SAI) क्रीडा केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला. तिथे मिळालेल्या प्रशिक्षणाने त्याच्या कौशल्याला धार आणली. "कांस्यपदक ही केवळ सुरुवात आहे. पॅरा आशियाई खेळ आणि पॅरालिंपिकमध्ये 232 किलो वजनाचा जागतिक विक्रम मोडणे हे माझे पुढील ध्येय आहे," असा निर्धार झंडू कुमारने व्यक्त केला आहे.
राष्ट्रमंडल खेल 2026 में भारत का पदक खाता खोलते हुए पैरा पावरलिफ्टिंग की पुरुष हेवीवेट स्पर्धा में कांस्य पदक जीतने पर श्री झंडू कुमार जी को हार्दिक बधाई।
— Yashodhara Raje Scindia (@yashodhararaje) July 25, 2026
आपकी अदम्य इच्छाशक्ति, कठिन परिश्रम और अटूट समर्पण ने देश का गौरव बढ़ाया है। आपकी यह उपलब्धि पूरे देश के लिए प्रेरणास्रोत… pic.twitter.com/p27zLBGOhs
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world