टीम इंडियाच्या ब्लू जर्सीमध्ये दिसणार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आता खाकी वर्दीत दिसणार आहे. मोहम्मद सिराज याला तेलंगणा सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. सिराजला तेलंगणा पोलीस विभागाने DSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी शुक्रवारी (11 ऑक्टोबर) त्याला नियुक्ती पत्र दिले. यानंतर सिराजने अधिकृतरित्या पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर तेलंगणा सरकारने सिराजला ग्रुप-1 ची नोकरी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तेलंगणा पोलिसात त्याला डीएसपी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र सिराजच्या क्रिकेट कारकिर्दीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. सिराज यापुढेही टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे.
(नक्की वाचा- IND vs AUS: रोहित शर्मा नसेल कर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? इथं वाचा उत्तर)
तेलंगणा सरकारकडून घरासाठी जमीन
पोलीस उपअधीक्षक पदाव्यतिरिक्त तेलंगणा सरकारने सिराजला हैदराबादच्या जुबली हिल्सच्या रोड क्रमांक 78 वर 600 स्क्वेअर यार्ड जमीन दिली आहे. ही जमीन सिराजला घर बांधण्यासाठी देण्यात आली आहे.
मोहम्मद सिराजशिवाय दोन वेळा विश्वविजेती बॉक्सर निखत जरीनलाही डीएसपी कॅडरची गट-1 ची नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी, राज्य सरकारने तेलंगणा पब्लिक सर्व्हिसेसमधील कायद्यात सुधारणा देखील केली होती. निखत जरीन हिने देखील 18 सप्टेंबर रोजी डीएसपी म्हणून पदभार स्वीकारला आहे. आता सिराजची देखील नियुक्ती झाली आहे.
(PAK vs ENG 1st Test : पाकिस्तानचं घरच्या मैदानावर वस्त्रहरण, 556 रन करुनही एका इनिंगनं पराभव)
मोहम्मद सिराजची कारकिर्द
मोहम्मद सिराजला बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो खेळताना दिसणार आहे. सिराजने नोव्हेंबर 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाकडून पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 29 कसोटीत 78 विकेट्स, 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 71 विकेट्स आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.