पाकिस्तान क्रिकेट टीमची घरच्या मैदानावर पुन्हा एकदा नामुश्की झाली आहे. इंग्लंड विरुद्ध मुलतानमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचा एक इनिंग आणि 47 रननं पराभव झाला. या पराभवानंतर तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये इंग्लंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
पाकिस्ताननं पहिल्या इनिंगमध्ये 556 रनचा विशाल स्कोअर केला होता. त्यानंतरही शान मसूदच्या टीमला लाजीरवाणा पराभव टाळता आला नाही. 'सिमेंट ट्रॅक' म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असणाऱ्या मुलतानच्या पिचवर इंग्लंडच्या बॅटर्सनी चांगलेच हात साफ केले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकविसाव्या शतकात पहिल्यांदाच...
इंग्लंडकडून पहिल्या इनिंगमध्ये जो रुटनं डबल सेंच्युरी तर हॅरी ब्रुकनं ट्रिपल सेंच्युरी केली. गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रुटनं त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोच्च स्कोअर केला. त्यानं 375 बॉलमध्ये 262 रन केले. तर पाकिस्तानला गेल्या दौऱ्यात छळणाऱ्या हॅरी ब्रुकनं तर थेट ट्रिपल सेंच्युरी झळकावली.
हॅरी ब्रुकनं 322 बॉलमध्ये 29 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 317 रन केले. एकविसाव्या शतकात ट्रिपल सेंच्युरी करणारा तो इंग्लंडचा पहिला बॅटर ठरला. रुट आणि ब्रुक जोडीनं चौथ्या विकेटसाठी 454 रनची पार्टनरशिप केली. या पार्टनरशिपच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या इनिंग 7 आऊट 823 रनवर घोषित केली.
HARRY BROOK BECOMES THE FIRST ENGLAND PLAYER TO SCORE TRIPLE HUNDRED IN THIS CENTURY. 🙇🔥 pic.twitter.com/U435UiSbjg
— Johns. (@CricCrazyJohns) October 10, 2024
दबावात पाकिस्तान कोसळलं
इंग्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये पाकिस्तानवर 267 रनची आघाडी घेतली होती. मुलतान पिचचं स्वरुप पाहाता पाकिस्तान दुसऱ्या इनिंगमध्येही मोठा स्कोअर करेल असा त्यांच्या फॅन्सचा अंदाज होता. पण, पाकिस्तानच्या टीमनं पुन्हा एकदा फॅन्सना निराश केलं. पाकिस्तानची दुसरी इनिंग फक्त 220 रनवर संपुष्टात आली.
( नक्की वाचा : पाकिस्तानी क्रिकेटपटूचा झाला भारतीय हिंदू मुलीशी साखरपुडा, लग्नानंतर मुलगी स्विकारणार इस्लाम! )
बाबर आझम, मोहम्मद रिझवानसह पाकिस्तानच्या सर्वच प्रमुख बॅटर्सनी निराशा केली. सलमान आगानं (63) आणि अमर जमालनं (55) रन करत थोडा प्रतिकार केला. त्यामुळे पाकिस्ताननं 200 रनचा टप्पा पार केला आणि त्यांच्या पराभवातील अंतर कमी झालं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world