IPL 2025 : आयपीएल स्पर्धेतील 11 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने अटीतटीच्या लढतील चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. सर्वांच लक्ष असलेल्या महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा फॅन्सची निराशा केली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या धोनीने काही फटकेबाजी केली आणि नंतर संदीप शर्माच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायरने त्याला झेलबाद केले .
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धोनीला पॅव्हेलियन जाताना पाहून गुवाहाटीतील संपूर्ण क्रिकेट स्टेडियम शांत झाले. राजस्थान रॉयल्सचे हे होम ग्राउंड असले तरी चाहते धोनीची बॅटिंग पाहण्यासाठी उत्सुक होते. हेटमायरने डीप मिड-विकेट बाउंड्रीवर शानदार डायव्हिंग कॅच घेतल्यानंतर धोनीच्या महिला फॅन दिलेली रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. रातोरात ही तरुणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
धोनी आऊट झाल्यानंतर ही तरुणी रागाने दात आवळून हातवारे करत मुठ आवळताना दिसत आहे. हेटमायरने कॅच घेतल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर राग आणि निराशा अशी संमिश्र भावना दिसत होती. अशावेळी हेटमायर समोर असता तर या तरुणीने काय केलं असतं? असा प्रश्न देखील लोक गमतीने सोशल मीडियावर विचारल आहेत.
(नक्की वाचा- RR Vs CSK: ऋतुराजची वादळी खेळी व्यर्थ! अटीतटीच्या लढतीत राजस्थानचा विजय)
चेन्नईला शेवटच्या षटकात 20 धावांचा आवश्यकता होती. धोनी जोवर क्रीजवर होता तोपर्यंत चेन्नईला विजयाची आशा होती. मात्र धोनी 10 चेंडूत 16 धावा करुन बाद झाला. अखेर सुपरकिंग्जसाठी 6 धावांनी पराभव झाला.
या पराभवामुळे चेन्नई सुपरकिंग्सने सलग दोन सामने गमावले आहेत. 5 वेळा विजेत्या संघाने सीजनमधील त्यांचा पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर त्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे.