IND vs ENG, 4th Test: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत जाडेजाने अनेक वेळा गरजेच्या वेळी फलंदाजीने दाखवून दिले आहे की तो संघासाठी किती महत्त्वाचा आहे.
मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जाडेजाने एक असा पराक्रम करून दाखवला आहे, जो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कपिल देव, विनू मांकड किंवा अन्य कोणत्याही अष्टपैलू खेळाडूला करता आलेला नाही. जाडेजा आता परदेशी भूमीवर एकाच देशात किमान 1000 धावा आणि 30 विकेट घेणारा क्रिकेट इतिहासातील केवळ तिसरा अष्टपैलू खेळाडू बनला आहे. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एक मोठा टप्पा आहे.
(नक्की वाचा- Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार? माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा)
जेव्हा या खास विक्रमाचा विषय येतो, तेव्हा वेस्ट इंडिजचे माजी महान अष्टपैलू गॅरी सोबर्स सर्वात अव्वल स्थानावर आहेत. सोबर्स यांनी इंग्लंडच्या भूमीवर 1820 धावा आणि 62 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. सोबर्स यांनीही हा पराक्रम इंग्लंडविरुद्धच केला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचे विलफ्रेड रोड्स हे आणखी एक अष्टपैलू खेळाडू आहेत, ज्यांनी ही कामगिरी केली आहे. रोड्स यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली आहे. रोड्स यांच्या नावावर ऑस्ट्रेलियामध्ये 1032 धावा आणि 42 विकेट जमा आहेत.
रवींद्र जाडेजासाठी रोड्स यांना मागे टाकणे खूप कठीण आहे. धावांच्या बाब
(नक्की वाचा - Jasprit Bumrah : शुबमन गिल कॅप्टन कसा झाला? जसप्रीत बुमराहनं सांगितली Inside Story )
सध्या सुरू असलेल्या मालिकेत त्याच्याकडे फक्त ओव्हल कसोटी शिल्लक आहे. आणि पुढच्या वेळी त्याचे इंग्लंड दौऱ्यावर येणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे हा विक्रम मोडणे त्याच्यासाठी मोठे आव्हान असेल. मात्र, जाडेजाने केलेल्या या कामगिरीमुळे त्याचे नाव जागतिक क्रिकेटमध्ये एका विशेष स्थानावर कोरले गेले आहे.