जाहिरात

Happy Birthday Vinod Kambli : सचिन, लारा, विराटसह कुणालाही मोडता आला नाही विनोद कांबळीचा हा रेकॉर्ड

Vinod Kambli Birthday : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा शनिवारी (18 जानेवारी) वाढदिवस आहे.

Happy Birthday Vinod Kambli : सचिन, लारा, विराटसह कुणालाही मोडता आला नाही विनोद कांबळीचा हा रेकॉर्ड
मुंबई:

Vinod Kambli Birthday : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा शनिवारी (18 जानेवारी) वाढदिवस आहे. मुंबईचा शैलीदार खेळाडू आता 53 वर्षांचा झाला आहे. विनोद सध्या क्रिकेटबाह्य कारणांमुळेच चर्चेत आहे. तो काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सचिन तेंडुलकरसोबत विनोद एका कार्यक्रमात दिसला होता. त्या कार्यक्रमात विनोदची तब्येत पाहून सर्वांच्या काळजात धस्स झालं होतं. त्यानंतर त्याला काही दिवस ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विनोद कांबळीनं मुंबईतील शिवाजी पार्कच्या मैदानात रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद दोघेही आचरेकर सरांचे शिष्य. सचिन-विनोद जोडीनं शालेय क्रिकेट नाबाद 664 रनची पार्टरनशिप केली होती. आचरेकर सरांनी शारदाश्रमची इनिंग घोषित केली त्यावेळी कांबळी 349 रन्सवर खेळत होता.

विनोदचा अबाधित रेकॉर्ड

विनोद कांबळीनं 17 टेस्ट आणि 104 वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. कांबळी 1995 साली शेवटची टेस्ट तर 2000 मध्ये शेवटची वन-डे मॅच खेळला. विनोद कांबळीनं आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळून आता दोन तप उलटली आहेत. पण, त्यानंतरही त्याचा एक रेकॉर्ड अद्याप अबाधित आहे.

( नक्की वाचा : Wankhede Stadium 'तुम्ही घाटी लोक...' मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं मुंबईचं वानखेडे स्टेडियम )
 

सर डॉन ब्रॅडमन, व्हिव्ह रिचर्ड सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रुट या क्रिकेटपटूंच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी जगभरातील वेगवेगळ्या मैदानात आव्हानात्मक परिस्थितीमध्ये टेस्ट क्रिकेट रन्स काढले आहेत. त्याचबरोबर त्यांची टेस्ट कारकिर्दही विनोद कांबळीपेक्षा मोठी होती. पण, या क्रिकेटपटूंसह जगभरातील कोणत्याही क्रिकेटपटूंना विनोद कांबळींचा हा रेकॉर्ड मोडता आलेला नाही.

विनोदनं टीम इंडियात जबरदस्त पदार्पण केलं होतं. त्यानं त्याच्या आक्रमक बॅटिंगच्या जोरावर पहिल्या सात सामन्यांमध्येच चार सेंच्युरी झळकावल्या होत्या. त्यामध्ये दोन डबल सेंच्युरींचा समावेश आहे. कोणत्याही क्रिकेटपटूला टेस्ट क्रिकेटमध्ये विनोदचा हा रेकॉर्ड मोडता आलेला नाही. 

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1000 रन्स करण्याचा भारतीय रेकॉर्ड अजूनही विनोद कांबळीच्याच नावावर आहे. त्यानं 14 इनिंगमध्येच हजार रन्सचा टप्पा ओलांडला. भारताकडून यशस्वी जैस्वाल या रेकॉर्डच्या जवळ आला होता. पण, त्यालाही टेस्ट क्रिकेटमध्ये पहिले हजार रन्स करण्यासाठी 16 इनिंग लागल्या.   

( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल )
 

विनोद कांबळीला सुरुवातीच्या यशानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी मजल मारता आली नाही. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 54.20 च्या सरासरीनं 1084 रन केले. त्यामध्ये चार सेंच्युरी आणि तीन हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. तर वन-डे क्रिकेटमध्ये 32.59 च्या सरासरीनं 2477 रन्स केलेय. या प्रकारात दोन सेंच्युरी आणि 14 हाफ सेंच्युरी त्याच्या नावावर आहेत.

विनोद कांबळीनं 2009 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर 2011 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com