जाहिरात

IND vs SL : श्रीलंका सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर, 'गंभीर' पर्वातील टीमची 5 महत्त्वाची वैशिष्ट्यं

BCCI Announced Team India Squad vs SL T20 and ODI: गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय टीमचा कोच झाल्यानंतरची ही पहिलीच सीरिज आहे. या सीरिजसाठी निवडण्यात आलेल्या टीमवर गौतम गंभीरची छाप दिसत आहे. 

IND vs SL : श्रीलंका सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर, 'गंभीर' पर्वातील टीमची 5 महत्त्वाची वैशिष्ट्यं
India vs Sri Lanka Squad
मुंबई:


BCCI Announced Team India Squad vs SL T20 and ODI:  श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या 3 T20 आणि 3 वन-डे मॅचसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान ही सीरिज होणार आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय टीमचा कोच झाल्यानंतरची ही पहिलीच सीरिज आहे. या सीरिजसाठी निवडण्यात आलेल्या टीमवर गौतम गंभीरची छाप जाणवत आहे. 

पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 मधील T20 वर्ल्ड कप जिंकणे हे गौतम गंभीर समोरचं लक्ष्य आहे. गंभीरनं या दोन मोठ्या स्पर्धांची तयारी पहिल्याच सीरिजपासून सुरु केलीय. गंभीर काळात निवडण्यात आलेल्या टीमची 5 प्रमुख वैशिष्ट्य काय हे पाहूया

सूर्यकुमार यादव T20 कॅप्टन : T20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन होता. रोहितच्या अनुपस्थितीमधील काही T20 सीरिजमध्येही हार्दिकनं टीमचं नेतृत्त्व केलं होतं. टी20 क्रिकेटमधून रोहित शर्मा निवृत्त झालाय. त्यामुळे या टीमचा हार्दिक पांड्या कॅप्टन होईल, असं मानलं जात होतं. पण, निवड समितीनं सुर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कॅप्टन म्हणून घोषणा करत सर्वांनाच धक्का दिलाय. गंभीरच्या सल्ल्यानंतरच टीमची ही निवड झाल्याचं मानलं जात आहे.

गिलवर मोठी जबाबदारी : शुबमन गिलचं प्रमोशन ही 'गंभीर काळातील' एक महत्त्वाची गोष्ट आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या टीमचा शुबमन कॅप्टन होता. त्यानंतर T20 आणि वन-डे या दोन्ही टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून गिलवर जबाबदारी दिलीय. गिलमधील टॅलेंटवर कुणालाही संशय नाही. त्याचबरोबर वय हा देखील त्याची जमेची बाजू आहे. भविष्यातील टीम बांधणीचा विचार करुन अनेक सीनिअर खेळाडूंना बाजूला करुन गिलला दोन्ही टीमचा व्हाईस कॅप्टन असेल असं मानलं जातंय.

( नक्की वाचा : द्रविडचा आवडता असल्यानं शुबमन गिल कॅप्टन झाला? टीम इंडियाच्या खेळाडूनं केला खुलासा )
 

T20 ची ओपनिंग जोडी ठरली : झिम्बाब्वे सीरिजमध्ये यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड हे चार ओपनर टीममध्ये होते. श्रीलंका सीरिज विरुद्धच्या T20 टीममध्ये  यशस्वी आणि गिल या दोघांचीच निवड करण्यात आली आहे. T20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या 15 जणांच्या टीममध्येही हे दोघं होते. रोहित-विराट अंतिम 11 मध्ये असल्यानं त्यांना संधी मिळाली नाही. आता भविष्यात यशस्वी-गिल ही जोडी टीमची सुुरुवात करेल याचे संकेत या टीममधून मिळाले आहेत.

शक्तीशाली वन-डे टीम : टी20 टीममध्ये तरुण खेळाडूंना संधी देत असतानाच वन-डे टीमममध्ये अनुभवी खेळाडूंनाच पसंती देण्यात आलीय. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे वन-डे वर्ल्ड कप गाजवलेल्या खेळाडूंचा श्रीलंका सीरिजमध्ये समावेश करण्यात आलाय. ऋषभ पंतनंही वन-डे टीममध्ये पुनरागमन केलंय. तर रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देत अनुभवाबरोबरच भविष्यातील टीमचा विचार गंभीर आणि निवड समितीनं केला आहे.

रोहित-विराट खेळणार : श्रीलंका विरुद्धची वन-डे सीरिज रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नाहीत, असं मानलं जात होतं. पण, या दोघांचीही टीममध्ये निवड झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी टीम इंडियानं श्रीलंका सीरिजपासूनच सुरु केली आहे. हा महत्त्वाचा संदेश या टीम निवडीतून मिळतोय.

( नक्की वाचा : द्रविडनं विजेतेपद मिळवून दिलं, नवा हेड कोच गंभीरसमोर आहेत 5 मोठी आव्हानं )
 

टी20 टीम: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई , अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

वन-डे टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वाशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.

भारत-श्रीलंका का शेड्यूल  (IND vs SL T20I Schedule)
27 जुलै- पहली टी20, पल्लेकेल 
28 जुलै- दूसरी टी20, पल्लेकेल 
30 जुलै- तिसरी टी20, पल्लेकेल 

वन-डे सीरीज, IND vs SL ODI Schedule
2 ऑगस्ट- पहली वन-डे, कोलंबो 
4 ऑगस्ट- दूसरी वन-डे, कोलंबो 
7 ऑगस्ट- तिसरी वन-डे, कोलंबो
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com