जाहिरात

Hockey India: भारतीय हॉकी संघाची नवीन जर्सी वादात! माजी कर्णधार विरेन रसकिन्हा भडकले

आगामी FIH पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच केली आहे. या वेळी भारतीय हॉकी संघाची जर्सी निळ्या रंगाऐवजी केशरी रंगात सादर करण्यात आली आहे.

Hockey India: भारतीय हॉकी संघाची नवीन जर्सी वादात!  माजी कर्णधार विरेन रसकिन्हा भडकले

ऑगस्ट महिन्यात सुरू होणाऱ्या एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेपूर्वी हॉकी जगतात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. हॉकी इंडियाने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला संघांची नवीन अधिकृत जर्सी प्रदर्शित केली आहे. मात्र, यंदा पारंपरिक निळा रंग बदलून जर्सीसाठी केशरी रंगाची निवड करण्यात आली आहे.

जर्सीचा हा नवा रंग समोर येताच हॉकीप्रेमींसह माजी खेळाडूंनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. भारताचा माजी कर्णधार विरेन रसकिन्हा याने सोशल मीडियावर थेट हॉकी इंडियाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विरेन रसकिन्हाची संतप्त प्रतिक्रिया

भारताचा माजी कर्णधार विरेन रसकिन्हा याने 'X' वर आपली नाराजी व्यक्त करताना लिहिले की, "हॉकी इंडियाने भारतीय हॉकीसाठी अनेक उत्तम गोष्टी केल्या आहेत, हे मला मान्य करावे लागेल. पण जर्सीचा हा निर्णय खरोखरच लज्जास्पद आहे. भारतीय हॉकी संघाची ओळख आणि वारसा नेहमीच 'निळ्या रंगाशी' जोडलेला राहिला आहे. मी अनेक वर्षे अत्यंत अभिमानाने निळी जर्सी परिधान केली आहे. देशवासी आणि चाहते आपल्या भारतीय संघाला निळ्या जर्सीमध्येच पाहू इच्छितात. मग अचानक ही जर्सी केशरी करण्याचा तर्क काय?"

(नक्की वाचा-  Ajinkya Rahane: ब्रेकिंग! अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला अलविदा; सर्व स्तरांतून निवृत्तीची घोषणा)

पुरुष आणि महिला विश्वचषकाचे वेळापत्रक

पुरुष विश्वचषक: 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे आयोजित केला जाणार आहे.
महिला विश्वचषक: 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.

भारतीय पुरुष आणि महिला संघांचे गट

पुरुष संघ

भारतीय पुरुष संघाचा समावेश ड गटात  करण्यात आला असून, भारतासोबत इंग्लंड, वेल्स आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान हे संघ आहेत. भारताने 1975 मध्ये पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत शेवटचा विश्वचषक जिंकला होता. गेल्या 50 वर्षांपासून भारताला विश्वचषकाचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. 2023 च्या भुवनेश्वर विश्वचषकात 9 व्या क्रमांकावर राहिलेला भारतीय संघ, यंदा सलग दोन ऑलिम्पिक कांस्यपदके आणि आशिया कप विजेतेपदाच्या जोरावर सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

महिला संघ 

भारतीय महिला संघाचा पहिला सामना 16 ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध होणार आहे. त्यानंतर भारत ड गटात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध खेळेल. संघाची कर्णधार सलिमा टेटे  म्हणाली, "आमचा संपूर्ण संघ या आव्हानासाठी उत्सुक आहे. आमची तयारी उत्तम झाली असून, पहिल्याच सामन्यात चीनविरुद्ध विजय मिळवून स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करण्याचा आमचा प्रयत्न असेल."
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com