ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानमधील कराचीमध्ये सुरुवात होत आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनं होणार असून टीम इंडिया सर्व सामने दुबईत खेळणार आहे. आता ही स्पर्धा जेमतेम 40 दिवसांवर येऊन ठेपलीय. पण, त्याचवेळी पाकिस्तानला स्पर्धेचं यजमानपद गमावण्याची नामुश्की सहन करावी लागू शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे कारण?
पाकिस्तानमधील लाहोर, कराची आणि रावळपिंडी या तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होणार आहेत. या ठिकाणच्या स्टेडियमची अवस्था अतिशय निराशाजनक आहे, अशी माहिती आका समोर आलीय. यापैकी एका स्टेडियमचे अद्याप प्लॅस्टरही पूर्ण झालेलं नाही.
'हे अतिशय खराब दृश्य आहे. तीन्ही स्टेडियमवर अद्याप बरीच कामं प्रलंबित आहेत. त्या मैदानात अजून बांधकाम सुरु आहे. आसन व्यवस्था, फ्लडलाईट्स, आऊटफिल्ड, खेळपट्टी या सारख्या अनेक गोष्टींमध्ये कामं बाकी आहेत, अशी माहिती सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली.
लाहोरनधील गद्दाफी स्टेडियममध्ये अजून प्लॅस्टर देखील पूर्ण झालेलं नाही. आयसीसीच्या चेक लिस्टप्रमाणे हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. पण, नियोजित वेळेत नॅशनल स्टेडियमचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे, असं या सूत्रांनी सांगितलं.
( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : भारत - पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत 'या' तारखेला भिडणार, वाचा संपूर्ण वेळापत्रक )
गद्दाफी स्टेडियनमध्ये साखळी फेरीत सामन्यांसह एक सेमी फायनल आणि भारत क्वालिफाय झाला नाही तर स्पर्धेची फायनल मॅच होणार आहे. पण, हे स्टेडियम सध्या आदर्श परिस्थितीपासून खूर दूर आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) ओव्हरटाईम करण्याशिवाय काहीही पर्याय नाही. त्याचबरोबर घाईगडबडीत झालेल्या कामांमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची खबरदारी आयसीसीला घ्यावी लागेल.
आयसीसीच्या नियमानुसार यजमान देशाला स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच काही आठवडे आधीच स्टेडियम बांधून आयसीसीला सोपवावे लागतात. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन्ही स्टेडियम आयसीसीकडं सोपवण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी आहे.
Gaddafi Stadium (yesterday)
— Sohail Imran (@sohailimrangeo) January 7, 2025
Finishing deadline 25 January #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/JcI32tZZ3K
T20 वर्ल्ड कप 2024 दरम्यान अमेरिकेतील खराब स्टेडियममुळे आयसीसीची चांगलीच बदनामी झाली होती. आता पुन्हा एकदा तशीच बदनामी सहन करण्याऐवजी पाकिस्तानचं यजमानपद रद्द करण्यावर आयसीसी विचार करु शकते. त्या परिस्थितीमध्ये ही संपूर्ण स्पर्धा दुबईला खेळवण्यात येऊ शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आठ देश सहभागी होणार असून त्यांची विभागणी दोन गटात करण्यात आली आहे. भारताचा यजमान पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात समावेश करण्यात आला आहे. 19 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड मॅचनं या स्पर्धेला सुरुवात होईल. तर टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world