जाहिरात

Champions Trophy 2025 : ICC चा प्लॅन तयार, पाकिस्ताननं हेका सोडला नाही तर 'या' देशात होणार स्पर्धा!

Champions Trophy 2025 : ICC चा प्लॅन तयार, पाकिस्ताननं हेका सोडला नाही तर 'या' देशात होणार स्पर्धा!
मुंबई:

ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या स्पर्धेचा यजमान देश असलेल्या पाकिस्ताननं त्यांचा हेका सोडला नाही तर त्यांना या स्पर्धेचं यजमानपद गमावावं लागू शकतं. या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार नाही, या बातमीला आयसीसीनं नुकताच दुजोरा दिला आहे. 

टीम इंडियाचे सर्व सामने हायब्रीड मॉडेलनुसार युएईमध्ये व्हावे, असं आयसीसीचं मत आहे. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ला हे मान्य नाही. भारतीय टीमनं पाकिस्तानच्या दौऱ्यावर यावं आणि पाकिस्तानमध्ये सर्व सामने खेळावे अशी पीसीबीची इच्छा आहे. पीसीबीनं त्यांचा हेका सोडला नाही तर आयसीसीनं पाकिस्तानचं यजमानपद रद्द करण्याचा प्लॅन तयार केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'स्पोर्ट्स तक' नं दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीनं दिलेली सूचना आयसीसीनं मान्य केली नाही, तर चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली जाऊ शकते. त्याचबरोबर पीासीबीला त्यांच्या होम ग्राऊंडवर ही स्पर्धा आयोजित करायला मिळाली नाही, तर पाकिस्तान स्पर्धेतून नावं मागं घेऊ शकतं, असंही या वृत्तामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानचे वृत्तपत्र 'डॉन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारतीय टीमनं पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीनं त्याचं यजमानपद रद्द केलं तर पाकिस्तान या स्पर्धेतून माघार घेऊ शकतं. 

डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन!

( नक्की वाचा :  डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन! )

दोन्ही देशांमधील प्रश्नांवर तोडगा निघाेपर्यंत आयसीसी तसंच आशिया क्रिकेट परिषदेतील कोणत्याही मॅचमध्ये भारतासोबत खेळू नये, असा सल्ला पाकिस्तान सरकार पीसीबीला देऊ शकतं असं वृत्तंही  
डॉननं दिलं आहे.

यापूर्वी गेल्या वर्षी झालेला आशिया कप हायब्रीड मॉडेलनं झाला होता. त्यामध्ये भारतीय टीमनं पाकिस्तानमध्ये खेळण्यान नकार दिला होता. त्यानंतर भारताचे सामने तसंच फायनल मॅच श्रीलंकेमध्ये खेळवण्यात आली होती. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हे मॉडेस स्विकारण्यास पीसीबीनं अद्याप मान्यता दिलेली नाही. 

सध्याच्या वेळापत्रकानुसार 19 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा सुरु होणार आहे. तर 9 मार्च रोजी स्पर्धेची फायनल खेळवली जाईल. लाहोर, रावळपिंडी आणि कराची या तीन ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 8 टीम सहभागी होणार आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com