T20 World Cup 2026: बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्याकांडाचे तीव्र पडसाद क्रिकेट विश्वातही उमटले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेशचा डावखुरा गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला आयपीएलमधून (IPL)मधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्यात भारतात खेळवल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2026) सहभागी न होण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशला आगामी काळात अनेक कठोर निर्णयांना सामोरं जावं लागू शकतं. यापूर्वी भारतीय बोर्डासोबत झालेल्या वादानंतर बांगलादेशने त्यांच्या देशात IPL चं थेट प्रसारण बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
तसच भारतात यंदा होणाऱ्या T20 विश्वचषकातील आपले सामने कोणत्या तरी तिसऱ्या देशात खेळण्याची मागणीही बांगलादेश बोर्डाने केली होती. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत BCB ने हा पर्याय खुला असल्याचेही स्पष्ट केले. परंतु, बांग्लादेश त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे.आता आयसीसी यावर काय निर्णय घेते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ICC कडे आहेत हे पर्याय :
बांगलादेशच्या सामन्यांचे गुण काढून घेतले जातील
बांगलादेशला मेगा इव्हेंटच्या पहिल्याच दिवशी 7 फेब्रुवारीला पहिला सामना खेळायचा आहे. पण, जर बांगलादेशने फक्त भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला,तर त्यांच्या सामन्यांचे गुण काढून घेतले जातील. अशा परिस्थितीत बांगलादेशला शून्य गुण मिळतील.तर प्रतिस्पर्धी संघाला संपूर्ण गुण दिले जातील. ज्या सामन्याचे गुण काढून घेतले जातील, तो सामना पु्न्हा खेळता येणार नाही.
नक्की वाचा >> Nagpur Mayor 2026 : नागपूरमध्ये कोण होणार महापौर? का होतेय शिवानी दाणी यांची चर्चा? वाचा Inside Story
याशिवाय, बांगलादेशला करारभंगासाठी (“ब्रीच ऑफ अॅग्रीमेंट”) ICC कडून कारवाईलाही सामोरे जावे लागेल. तसेच, ऑपरेशनल खर्च — जसे की प्रवासाचा खर्च, प्रसारणातील अडथळ्यांमुळे झालेले नुकसान इत्यादी..आर्थिक भारही बांग्लादेश क्रिकेट बोर्डालाच उचलावा लागेल.
2003 विश्वचषकातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी इंग्लंडने झिंबाब्वेविरुद्ध आणि न्यूझीलंडने केनियाविरुद्ध, वेगवेगळ्या परिस्थितींमुळे सामने न खेळण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी,दोन्ही संघांचे गुण ICC ने काढून घेतले होते.
जर बांगलादेशने संपूर्ण स्पर्धेतून माघार घेतली, तर त्यांना मोठा आर्थिक दंड बसू शकतो. ICC च्या नियमांनुसार हा अत्यंत गंभीर प्रकार मानला जातो.स्पर्धेत भाग घेण्याची फी पूर्णपणे गमवावी लागेल.ICC च्या एकूण महसुलातील त्यांचा हिस्सा काढून घेतला जाईल. तसेच प्रसारण (ब्रॉडकास्टिंग),प्रायोजक, लॉजिस्टिक्स यांसारख्या बाबींमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई ICC बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मागू शकते.
नक्की वाचा >> Sangli News: संगीतकार पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ, सांगली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं प्रकरण काय?
पर्यायी संघाला मिळेल जागा
बांगलादेशने माघार घेतली तर ICC त्यांच्या जागी दुसऱ्या संघाला T20 विश्वचषकात प्रवेश देईल. आताच्या नियमांनुसार स्कॉटलंड आणि जर्सी हे संघ जागा मिळवण्यासाठी अग्रेसर असल्याची माहिती आहे. दुसरा पर्याय असा की, ग्रुपमधील विरोधी संघांना वॉकओव्हर दिला जाऊ शकतो. हा निर्णय पूर्णपणे वेळ,लॉजिस्टिक्स आणि स्पर्धेच्या शेड्यूलवर अवलंबून असतो.
अशा परिस्थितीत होऊ शकतं निलंबन आणि…
जर ICC ला असे वाटले की बांगलादेशचा विश्वचषकातून हटण्याचा निर्णय राजकीय कारणांमुळे घेतला गेला आहे, तर ICC बांगलादेशला भविष्यातील ICC टूर्नामेंटमधून तात्पुरते निलंबित करू शकते.यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठ्या निर्णयांवर मतदानाचा अधिकार गमवावा लागू शकतो. ICC कडून मिळणारे विविध विशेष लाभ आणि निधी देखील थांबवले जाऊ शकतात. अशा प्रकारची कारवाई क्रिकेट इतिहासात क्वचितच झाली आहे, परंतु ICC च्या नियमावलीत याबाबत स्पष्ट तरतूद आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world