
Champions Trophy 2025 : भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर नाव कोरले. कर्णधार रोहित शर्माच्या 76 धावांच्या खेळीनंतर श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे टीम इंडिया न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स बनली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय संघाला 252 धावांचे लक्ष्य सोपे वाटत होते. परंतु एकवेळ न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीयांचं टेन्शन वाढवलं होतं. अखरे रोमांचक सामन्यात भारताने विजय मिळवला. भारताकडून रोहितने 76 धावा, श्रेयस अय्यरने 48 धावा आणि केएल राहुलने नाबाद 34 धावा केल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर स्वत: रोहित शर्माने भाष्य केलं आहे. भारताच्या विजयानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना रोहित शर्माने म्हटलं की, "भविष्याच्या सध्या कोणतीही योजना नाहीत. जे सुरू आहे ते सुरुच राहील. वनडे फॉरमॅटमधून सध्यातरी मी निवृत्ती घेणार नाही. यापुढे कृपया अशा अफवांना वाव देऊ नका."
(नक्की वाचा- IND Vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी भारताचीच, अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडला चारली धुळ)
Rohit Sharma cooked all his haters who were spreading rumours of his retirement. 😭🔥#INDvNZ
— 𝐕𝐢𝐬𝐡𝐮 (@Ro_45stan) March 9, 2025
pic.twitter.com/kONaJ1E4zu
श्रेयस अय्यर सायलेंट हिरो
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय संपूर्ण देशाला समर्पित केला. जेव्हा टीम इंडिया खेळत असते तेव्हा संपूर्ण देश त्याला पाठिंबा देत असतो,असं रोहितने म्हटलं. रोहित शर्माने श्रेयस अय्यरचीह कोतुक करत त्याला सायलेंट हिरो म्हटले.
(नक्की वाचा- IND Vs NZ: कॅच सुटल्यावर संतापल्या, बोल्ड होताच पुन्हा आनंदल्या; विराट- रोहितच्या पत्नीची रिअॅक्शन जोरदार व्हायरल)
रोहितने श्रेयस अय्यरबाबत म्हटलं की, "श्रेयस अय्यर हा आमचा सायलेंट हिरो आहे. मधल्या फळीत खेळताना अय्यरने संघासाठी महत्त्वाची खेळी केली. आजही त्याने अक्षर पटेलसोबत महत्त्वाची भागीदारी केली. मला माझ्या सहकाऱ्यांना जास्त काही सांगण्याची गरज नाही."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world