जाहिरात

IND Vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी भारताचीच, अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडला चारली धुळ

भारताकडून रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत 76 धावा केल्या. त्यात 3 षटकारांचा समावेश होता. भारताची सुरूवात चांगली झाली.

IND Vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी भारताचीच, अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडला चारली धुळ

भारताने चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताला 251 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने   षटकात पूर्व केले. भारताकडून रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत 76 धावा केल्या. त्यात 3 षटकारांचा समावेश होता. भारताची सुरूवात चांगली झाली. मात्र त्यानंतर 31 धावांवर शुभमन गिल बाद झाला. त्यानंतर केवळ एक धाव काढून विराट कोहली ही तंबूत परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. त्यांच्या या भागिदारीने विजयाचा पाया रचला. श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

श्रेयस अय्यननंतर अक्षर पटेलने 29 धावांची खेळी केली. त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या केएल राहुलने डाव सावरला. त्याला हार्दीक पंड्याची साथ मिळाली. मात्र हार्दीकही 18 धावा काढून बाद झाला. मात्र त्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनी जास्त पडझड होवू दिली नाही. केएल राहुलने 34 धावांची खेळी केली. भारताने न्यूझीलंडचा एक षटक आणि चार गडी राखून पराभव केला. टी ट्वेंटीनंतर भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे.  

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb tomb News: औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलं, महायुतीतच वाद पेटला?

त्या आधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्विकारवी. न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाच्या फिरकीपुढे लोटांगण घालताना पाहायला मिळाला. वरुण चक्रवर्ती, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीने किवींज फलंदाजांना रोखले. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला. टीम इंडियापुढे 252 धावांचे लक्ष ठेवले होते. 

ट्रेंडिंग बातमी - Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या. मायकेल ब्रेसवेलने 40 चेंडूत 53 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 2 षटकार लागले. तर डॅरिल मिशेलने 101 चेंडूत 63 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले. त्याचबरोबर रचिंद्र रविनने 37 धावा केल्या.  भारताकडून कुलदिप यादव आणि वरुण चक्रवतीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाने एकाला बाद केले.  डॅरिन मिचेलने न्यूझीलंडकडून सर्वाधिक 63 धावा केल्या. मायकेल ब्रेसवेल 53 धावांची खेळी केली. हे फलंदाज वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जास्त वेळ थांबता आले नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: