Suryakumar Yadav: ICC ला खुपला 'पहलगाम'चा उल्लेख, फायनलपूर्वी सुर्यावर मोठी कारवाई

ICC Action On Suryakumar Yadav : आशिया कपमध्ये एकाहून एक जबरदस्त सामने रंगत असून भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या महामुकाबल्यांची तुफान चर्चा रंगलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Suryakumar Yadav latest News

ICC Action On Suryakumar Yadav : आशिया कपमध्ये एकाहून एक जबरदस्त सामने रंगत असून भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या महामुकाबल्यांची तुफान चर्चा रंगलीय. आयसीसीने पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान आणि हारिफ रौफवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतर आता टीम इंडियाचा टी-20 चा कर्णधार सूर्यकुमार यादववर आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलवर (ICC)दंडात्मक कारवाई केलीय. आयसीसीच्या या निर्णयाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आव्हान दिलं आहे. आशिया कपमध्ये ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिला महामुकाबला रंगला होता. या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला होता.त्यावेळी सूर्यकुमार यादवने भारताचा हा विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना आणि भारतीय लष्कराला समर्पित केला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला होता आक्षेप

सूर्यकुमार यादवने भारताच्या विजयाबाबत दिलेल्या प्रतिक्रियानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतला आणि आयसीसीकडे याविषयी तक्रार नोंदवली. परंतु, सूर्यकुमार यावदने ती प्रतिक्रिया चाहत्यांच्या भावनांचा विचार करूनच दिल्याचं समोर आलं होतं. पण पाकिस्तान संघाने सूर्यकुमार यादवच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पीसीबीने अशीही तक्रार केली होती की, सूर्यकुमार यादवने हँडशेक न केल्याने खेळाडू वृत्तीच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना हँडशेक करणं अनिवार्य आहे, अशाप्रकारच्या कोणत्याही नियमाचं उल्लेख आयसीसीच्या रूल बुकमध्ये नाहीय. 

नक्की वाचा >> लोकं म्हणाली बजाव..बजाव! DJ वर गौतमी पाटील थिरकली अन् नंतर झाला तुफान राडा, पोलिसांनी लाठीचार्ज केला अन्..

सूर्यकुमार यादव आयसीसीचे मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासोबत 25 सप्टेंबरला हजर झाला होता.आयसीसीच्या अधिकृत सुनावणीत सूर्यकुमार दोषी ठरला नव्हता.ही सुनावणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तक्रारीनंतर घेण्यात आली होती. पीसीबीने आरोप लावला होता की, सूर्यकुमारच्या वक्तव्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. 

पाकिस्तानच्या खेळाडूंवरही केली होती कारवाई

आयसीसीने यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांच्यावर कारवाई केली होती. आयसीसीने हारिस रौफला 30 टक्के मॅच फी भरण्याची दंडात्मक कारवाई केली होती. तर साहिबजादा फरहानलाही आयसीसीने सुनावलं होतं. हारिस रौफने भारता विरोधात सुपर 4 सामन्यात वादग्रस्त इशारे केले होते. तसच अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलसोबतही त्याचा वाद झाला होता.फरहानने गन-सेलिब्रेशन करून भारतीयांच्या भावना दुखावल्या होत्या. 

Advertisement
Topics mentioned in this article