जाहिरात

लोकं म्हणाली बजाव..बजाव! DJ वर गौतमी पाटील थिरकली अन् नंतर झाला तुफान राडा, पोलिसांनी लाठीचार्ज केला अन्..

Gautami Patil Latest Viral Video : महाराष्ट्रातील सुपरस्टार नृत्यांगणा गौतमी पाटीलची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.मराठी लावण्यांवर डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

लोकं म्हणाली बजाव..बजाव! DJ वर गौतमी पाटील थिरकली अन् नंतर झाला तुफान राडा, पोलिसांनी लाठीचार्ज केला अन्..
Gautami Patil Dance Video Viral

समाधान कांबळे, प्रतिनिधी

Gautami Patil Latest Viral Video : महाराष्ट्रातील सुपरस्टार नृत्यांगणा गौतमी पाटीलची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते.मराठी लावण्यांवर डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सबेस कातील गौतमी पाटील, असा टॅग लागलेली डान्सर गौतमीने तरुणांना अक्षरक्ष:वेड लावलं आहे. तरुण पिढीच नव्हे बड्या राजकारणांच्या वैयक्तिक कार्यक्रमातही गौतमी पाटीलची प्रमुख उपस्थिती असते. यंदाच्या दहीहंडी उत्सवातही गौतमीने प्रचंड धुमाकूळ घातला होता.

परंतु, एखाद्या कार्यक्रमात गौतमीच्या चाहत्यांनी हुल्लडबाजी केल्यास, त्या कार्यक्रमाला गालबोट लागतं. असाच एक धक्कादायक प्रकार हिंगोली शहरात घडला आहे.नवरात्रौत्सवानिमित्त हिंगोली शहरामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमात प्रेक्षकांनी तुफान गर्दी करत गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. शिवसेना शिंदे गटाचे युवा जिल्हाप्रमुख राम कदम यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तुफान राडा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

नक्की वाचा >> भारतातच आहे Switzerland पेक्षा सुंदर ठिकाण! आनंद महिंद्राही झाले अवाक्..निसर्गाचा 'असा' Video कधी पाहिला नसेल

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरात नवरात्रौत्सवाची धामधूम सुरु आहे. अशातच शिंदे गटाचे युवा जिल्हाप्रमुख राम कदम यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पण या कार्यक्रमाला गौतमीच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. गौतमीला पाहताच तिच्या चाहत्यांना वेड लागतं आणि ते लोक कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. अशीच घटना या हिंगोलीच्या कार्यक्रमात घडली आहे. गौतमीच्या कार्यक्रमात लोकांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. 

त्या कार्यक्रमातही पोलिसांनी लोकांवर केला होता लाठीचार्ज 

गौतीम पाटीलने दहीहंडी उत्सवातही मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. जालना येथेही गौतमी पाटीलचा शो पार पडला होता. त्यावेळीही या डान्सिंग शो मध्ये लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. गौतमीच्या चाहत्यांनी मैदान भरगच्च भरल्याने काही तरुणांनी शेडवर चढून ठेका धरला.परंतु,तरुणांनी शो दरम्यान हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com