टी 20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मधील 11 वा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज खेळला जात आहे. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट आहे. सध्या पाऊस थांबला आहे, मात्र मागील काही तासांत जोरदार पाऊस झाला असून सामना सुरू होण्यापूर्वी देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. जर टीम इंडियाने हा सामना गमावला तर उपांत्य फेरी गाठण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. अशा स्थितीत भारतीय संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचेल. तर ऑस्ट्रेलियाला मात्र मोठा धक्का बसेल. सामना रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियाचे तीन गुण होतील. अशा स्थितीत बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत केलं तरच ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरी गाठता येईल.
(नक्की वाचा- झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शुबमन गिल कॅप्टन)
... तर टीम इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट!
ऑस्ट्रेलियानं भारतीय टीमला 41 पेक्षा जास्त रननं हरवलं आणि दुसरीकडं अफगाणिस्ताननं बांगलादेशचा 81 पेक्षा जास्त रननं पराभव केला तर नेट रन रेटमध्ये भारतीय टीम या दोन्ही टीमपेक्षा मागं पडू शकते. त्यावेळी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान सेमी फायनमध्ये दाखल होतील. आणि रोहित शर्मा आणि कंपनीला रिकाम्या हातांनी भारतामध्ये परतावं लागेल.
( नक्की वाचा : अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर विजय, अ गटात Super 8 फेरीची शर्यत झाली रंगतदार )
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जड़ेजा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज ,यशस्वी जयसवाल.
टीम ऑस्ट्रेलिया : ट्रॅविस हेड, डेविड वार्नर, मिशेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिंस, एश्टन एगर, एडम जम्पा, जोश हेजलवुड, मिशेल स्टार्क, जोश इंग्लिस, कॅमरून ग्रीन , नाथन एलिस.