IND vs AUS : पहिल्याच टेस्टमध्ये टीम इंडियासोबत धोका, राहुलला वादग्रस्त पद्धतीनं दिलं आऊट, Video

KL Rahul Was Out Controversially:   भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट पर्थमध्ये सुरु झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीत अंपायरनं तेल ओतलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
KL Rahul
मुंबई:

KL Rahul Was Out Controversially:  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली टेस्ट पर्थमध्ये सुरु झाली आहे. या टेस्टमध्ये भारतीय टीमची सुरुवात खराब झालीय. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये फक्त 150 रनवर आऊट झाली. एकाही भारतीय बॅटरला या इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी झळकावता आली नाही. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीत अंपायरनं देखील तेल ओतलं. पहिल्या इनिंगमध्ये आत्मविश्वासनं खेळत असलेल्या केएल राहुलला वादग्रस्त पद्धतीनं आऊट देण्यात आलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय घडलं?

पर्थ टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कॅप्टन जसप्रीत बुमराहनं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बुमराहच्या या निर्णयाचा टीमला फायदा घेता आला नाही. यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल हे तरुण खेळाडू खातंही न उघडता आऊट झाले. तर अनुभवी विराट कोहली देखील फक्त 5 रन काढून परतल्यानं टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला.

एका बाजूनं विकेट पडत असताना राहुल शांतपणे बाजू लावून उभा होता. पहिल्या सेशनमध्ये कोणतीही चूक न करणाऱ्या राहुलला थर्ड अंपायरनं वादग्रस्त पद्धतीनं आऊट दिलं. मिचेल स्टार्कच्या ज्या बॉलरवर राहुल आऊट झाला तो त्याच्या बॅटला नाही तर पॅडला लागला असल्याचं दिसत होतं. पण, थर्ड अंपायरनं वादग्रस्त पद्धतीनं राहुलला आऊट दिलं. केएल राहुलही या निर्णयावर नाराज झाला होता. पण, सर्वशक्तीमान अंपायरचा निर्णय मान्य केल्याशिवाय त्याच्यासमोर कोणताही पर्याय नव्हता.

( नक्की वाचा : IPL 2025 Auction : टीम इंडियासाठी 'करुन दाखवलं' राजस्थानमध्ये होणार? राहुल द्रविड कुणाला निवडणार? )
 

थर्ड अंपायरच्या या निर्णयाचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर उमटले. राहुल आणि टीम इंडियासोबत धोका झाला असल्याचं मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

Advertisement

केएल राहुलनं आऊट होण्यापूर्वी 74 बॉलचा सामना करत 26 रन केले. या खेळीच त्यानं 3 फोर लगावले.