जाहिरात

IPL 2025 Auction : टीम इंडियासाठी 'करुन दाखवलं' राजस्थानमध्ये होणार? राहुल द्रविड कुणाला निवडणार?

IPL 2025 Mega Auction : राहुल द्रविडनं टीम इंडियामध्ये जे करुन दाखवलं ते राजस्थान रॉयल्ससाठी करण्याचं आव्हान आहे. त्यासाठी द्रविड मेगा ऑक्शनमध्ये कुणाला खरेदी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

IPL 2025 Auction : टीम इंडियासाठी 'करुन दाखवलं' राजस्थानमध्ये होणार? राहुल द्रविड कुणाला निवडणार?
. टीम इंडियाला यावर्षी T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) जिंकून देणारा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) राजस्थानचा हेड कोच बनलाय. (फाईल फोटो)
मुंबई:

मानसी पिंगळे, प्रतिनिधी

IPL 2025 Mega Auction : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals)  आयपीएलचा पहिला सिझनचं विजेतेपद पटकावून सर्वांनाच चकित केलं होतं. पहिल्या सिझननंतर राजस्थानला आजवर विजेतेपद पटकावता आलेलं नाही. अर्थात संजू सॅमसनच्या (Sanju Samson) नेतृत्त्वाखाली राजस्थानची कामगिरी सुधारली आहे. संजूच्या कॅप्टनसीमध्ये राजस्थाननं IPL 2022 ची फायनल तर IPL 2024 मध्ये बाद फेरी (प्ले ऑफ) गाठली होती.

राजस्थानची कामगिरी सुधारली असली तरी 'रॉयल आर्मी' अद्याप विजेतेपदापासून दूर आहे. या सिझनमध्ये राजस्थानच्या मॅनेजमेंटनं विजतेपद मिळवण्यासाठी कंबर कसलीय. टीम इंडियाला यावर्षी T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) जिंकून देणारा कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) राजस्थानचा हेड कोच बनलाय. तर, द्रविडच्याच कोचिंग टीममधील सहकारी विक्रम राठोडची (Vikram Rathour) राजस्थान रॉयल्सनं बॅटिंग कोच म्हणून नियुक्ती केलीय. 

 ('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

टीम इंडियाला 2007 नंतर तब्बल 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कप जिंकून देण्याचं काम राहुल द्रविडनं केलंय. राहुल द्रविडनं टीम इंडियामध्ये जे करुन दाखवलं ते राजस्थान रॉयल्ससाठी करण्याचं आव्हान आहे. त्यासाठी द्रविड मेगा ऑक्शनमध्ये कुणाला खरेदी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

कुणाला केलं रिटेन?

राजस्थान रॉयल्सनं यंदा होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सहा खेळाडूंना रिटेन केलंय. कॅप्टन संजू सॅमसन, ओपनर यशस्वी जैस्वाल, ऑलराऊंडर रियान पराग, विकेट किपर ध्रुव जुरेल, वेस्ट इंडिजचा तडाखेबंद बॅटर शिमरॉन हेटमायर आणि फास्ट बॉलर संदीप शर्मा या सहा जणांना राजस्थाननं रिटेन केलंय.

कुणावर फोकस?

राजस्थान रॉयल्सनं त्यांचा प्रमुख खेळाडू जॉस बटलरला रिटेन न करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. यंदाच्या ऑक्शनसाठी राजस्थानकडं सर्वात कमी 41 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे या कमी बजेटमध्ये बटलरची कमतरता भरुन काढण्याचं चॅलेंज द्रविडच्या टीमकडं आहे. या जागेसाठी दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक बॅटर डेव्हिड मिलरचं नाव आघाडीवर आहे. बटलर यापूर्वी देखील राजस्थानकडून खेळलाय. 

'माझ्या मुलाचं करियर 4 जणांनी खराब केलं', संजू सॅमसनच्या वडिलांनी घेतली धक्कादायक नावं, Video

( नक्की वाचा : 'माझ्या मुलाचं करियर 4 जणांनी खराब केलं', संजू सॅमसनच्या वडिलांनी घेतली धक्कादायक नावं, Video )

राजस्थान रॉयल्सला त्यांचा बॉलिंट अटॅक मजबूत करण्यावरही भर द्यावा लागेल. त्यासाठी लेग स्पिनर युजवेंद्र चहलला परत खरेदी करणं ही द्रविडची पहिली प्राथमिकता असू शकते. त्याचबरोबर जेरॉल्ड कोएत्झी, टी नटराजन हे पर्याय देखील राजस्थान मॅनेजमेंटच्या डोळ्यासमोर असू शकतात. 

न्यूझीलंडचा ऑल राऊंडर राचिन रविंद्र, न्यूझीलंडचाच फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट तसंच टीम इंडियाचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग देखील राजस्थानच्या रडावर आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com