जाहिरात

India vs Australia Live Streaming: रोहित-विराट परतले! वनडे मालिकेचा थरार; लाईव्ह कधी अन् कुठे! वाचा...

India vs Australia ODI Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे सीरिजला रविवारपासून (19 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे.

India vs Australia Live Streaming: रोहित-विराट परतले! वनडे मालिकेचा थरार; लाईव्ह कधी अन् कुठे!  वाचा...
India vs Australia ODI Series: रोहित शर्मा आणि विराट कोहली 7 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहेत.
मुंबई:

India vs Australia ODI Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे सीरिजला रविवारपासून (19 ऑक्टोबर) सुरुवात होत आहे. विराट कोहली (Virat Kohli ) आणि रोहित शर्मा(Rohit Sharma) हे दोन दिग्गज खेळाडू सात महिन्यांच्या ब्रेकनंतर रविवारी आंतरराष्ट्रीय सामना खेळतील. त्यामुळे या सीरिजकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 2027 मध्ये  होणाऱ्या आयसीसी वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी टीम इंडिया या सीरिजपासून सुरु करणार आहे. 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: आकडेवारी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजवर एकूण 152 एकदिवसीय सामने झाले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 84 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून भारताने 58 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या 54 एकदिवसीय सामन्यांपैकी भारताने केवळ 14 सामने जिंकले आहेत, तर 38 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे आणि 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर भारतासाठी हा प्रवास नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे.

( नक्की वाचा : Virat Kohli : विराट कोहलीचा RCB ला नकार! व्यावसायिक करार नाकारल्याने एक्झिटच्या चर्चांना उधाण )
 

India vs Australia Live Telecast: सामने कुठे पाहता येतील?

लाईव्ह प्रक्षेपण (Live Telecast): भारतातील क्रिकेट चाहते या मालिकेतील सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) च्या विविध चॅनेल्सवर पाहू शकतात.

लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming): या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) मालिका देखील खेळवली जाणार आहे.

या एकदिवसीय मालिकेतील सामने खालीलप्रमाणे खेळवले जातील: 19 ऑक्टोबर रोजी पहिला एकदिवसीय सामना पर्थ स्टेडियम, पर्थ येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 23 ऑक्टोबर रोजी अॅडलेड ओव्हल, अॅडलेड येथे होईल आणि मालिकेतील तिसरा व अंतिम सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी येथे होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार (IST) सकाळी 9 वाजेपासून सुरू होतील.

दोनही संघाचे खेळाडू (Squads):

भारत: शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, के.एल. राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल.

ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, बेन द्वारशुईस, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलीप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क. (दुसऱ्या सामन्यापासून: ॲडम झाम्पा, ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिस)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com