जाहिरात

IND vs AUS : विराट कोहलीच्या बॅटनं केलं ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण, सचिनला मागे टाकून बनला नंबर 1

IND vs AUS : विराट कोहलीच्या बॅटनं केलं ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण, सचिनला मागे टाकून बनला नंबर 1
मुंबई:

Virat Kohli, India vs Australia : चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली सेमी फायनल टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं पराभव करत जिंकली आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 265 रन्सचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. शुबमन गिल आणि रोहित शर्मा झटपट आऊट झाले होते. त्यानंतर विराटनं मॅचची सर्व सुत्रं हाती घेतली.

विराटनं 98 बॉलमध्ये 84 रन्सची खेळी केली. या खेळीत त्यानं 5 फोर लगावले. विराट कोहलीची सेंच्युरी पूर्ण झाली नाही. पण, त्यानं आऊट होण्यापूर्वी भारताचा विजय जवळ आणला होता. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुलनं फटकेबाजी करत ती औपचारिकता पूर्ण केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विराटनं आऊट होण्यापूर्वी एक मोठा रेकॉर्ड करत सचिन तेंडुलकरला मागं टाकलं. विराटनं सेमी फायनलमध्ये (Ind vs Aus semifinal) वन-डे कारकिर्दीमधील 74 वी हाफ सेंच्युरी झळकावली. या हाफ सेंच्युरीसह तो ICC वन-डे स्पर्धेत (वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी) सर्वात जास्त हाफ सेंच्युरी लगावलेला बॅटर बनला आहे. त्यानं या स्पर्धेतील 53 व्या इनिंगमध्ये 24 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. 

विराटच्या या रेकॉर्डनंतर आता सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. ICC वन-डे स्पर्धेत सचिनच्या 58 इनिंगमध्ये 23 हाफ सेंच्युरी आहेत. याचात अर्थ विराटनं 5 कमी वन-डे मॅच खेळत सचिनचा विक्रम मोडला आहे.  

( नक्की वाचा : IND vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश )

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितनं ICC वन-डे स्पर्धेतील 42 इनिंगमध्ये 18 हाफ सेंच्युरी झळकावल्या. टॉप 3 मध्ये विराट, सचिन आणि रोहित हे तीन्ही भारतीय आहेत. तर चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा (56 इनिंग, 17 हाफ सेंच्युरी) तर पाचव्या नंबरवर ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंग (60 इनिंगमध्ये 16 हाफ सेंच्युरी ) आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: