जाहिरात

Ind vs Aus: मेलबर्न कसोटीत बुमराहचा जलवा, बड्या विक्रमांना गवसणी; चौथ्या दिवसअखेर स्थिती काय?

चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 228 धावा करत 9 गडी गमावले होते. त्यामुळे आता सामन्याच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाचा खेळ उंचावला तरच विजय मिळवणे शक्य होणार आहे. 

Ind vs Aus: मेलबर्न कसोटीत बुमराहचा जलवा, बड्या विक्रमांना गवसणी; चौथ्या दिवसअखेर स्थिती काय?

India Vs Australia Test Match: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या मेलबर्न कसोटी सामन्याचा चौथा दिवस संपला असून ऑस्ट्रेलियाने 333 धावांची आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 228 धावा करत 9 गडी गमावले होते. त्यामुळे आता सामन्याच्या अखेरच्या दिवशी टीम इंडियाचा खेळ उंचावला तरच विजय मिळवणे शक्य होणार आहे. 

बुमराहचा जलवा..

तत्पुर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या मेलबर्न कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे.  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात बुमराह एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. , 2024-25 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराहने आतापर्यंत एकूण 29 विकेट घेतल्या आहेत. आता बुमराह बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज बनला आहे.

या रेकॉर्डसह बुमराहने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज बेन हिल्फेनहॉसचा विक्रम मोडीत काढला आहे. ज्याने 2011-12 मालिकेत एकूण 27 विकेट घेतल्या होत्या. बॉर्डर-गावस्करच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हरभजन सिंगच्या नावावर आहे. भज्जीने 2001-02 मध्ये एका मालिकेत एकूण 32 विकेट घेतल्या होत्या. अश्विन या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने 2012-13 च्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत एकूण 29 विकेट घेतल्या होत्या. बुमराहलाही आता अश्विनची 29 विकेट्ससह बरोबरी करण्यात यश आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

200 बळी घेण्याचाही रेकॉर्ड

बुमराह सर्वात जलद २०० कसोटी बळी घेणारा जगातील चौथा वेगवान गोलंदाज ठरला आहे, तर भारतासाठी 200 कसोटी बळी घेणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाजही ठरला आहे. विशेष म्हणजे 20 पेक्षा कमी सरासरीने ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराहने उपाहारानंतरच्या सत्रात ट्रॅव्हिस हेडला (01) आपला 200 वा बळी बनवले, ज्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जडेजाची बरोबरी केली.

 जसप्रीत बुमराह सध्या चालू असलेल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 ​​मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. 31 वर्षीय बुमराहने गब्बा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान संघसहकारी आणि अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला मागे टाकले. बुमराहच्या नावावर 14 कसोटीत 74 बळी आहेत, तर बुधवारी तिसऱ्या कसोटीच्या अखेरीस निवृत्ती जाहीर करणाऱ्या अश्विनने 14 कसोटीत 63 बळी घेतले आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com