India vs Australia, Border Gavaskar Trophy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील चौथी टेस्ट टीम इंडियानं गमावलीय. मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्टमध्ये भारतीय टीम 184 रननं पराभूत झाली. या पराभवानंतर टीम इंडियातील तणावाचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील टीम इंडियाचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. त्याचबरोबर या सीरिजनंतर रोहित शर्माची कॅप्टनसी जाणार हे देखील नक्की आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमच्या हवाल्यानं प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार टीम इंडियातील एक सीनिअर खेळाडू रोहितनंतर कॅप्टन होण्यासाठी पूर्ण जोर लावत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीम इंडियात काय चाललंय?
'इंडियन एक्स्प्रेस' च्या रिपोर्टनुसार 'टीममध्ये काही मतभेद आहेत. एक सीनिअर खेळाडू स्वत:ला हंगामी कॅप्टन म्हणून प्रोजेक्ट करत आहे. या खेळाडूनं स्वत:ला 'मिस्टर फिक्स इट' (Mr. Fix-It) असं नाव दिलंय. टीममध्ये सध्या सुरु असलेला गोंधळ नीट करण्याची आपली क्षमता असल्याचा त्याचा दावा आहे.
भारतीय टीममधील काही तरुण खेळाडूंकडं भावी कॅप्टन म्हणून पाहिलं जातं. पण, त्याला कॅप्टन करण्यासाठी तो खेळाडू फारसा उत्सुक नाही. संभाव्य कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुण खेळाडूंना आणखी बरंच शिकणं आवश्यक आहे, असा या खेळाडूचा दावा आहे.
( नक्की वाचा : आता खूप झालं ! गौतम गंभीरची विराट-रोहितसह संपूर्ण टीमला तंबी, ड्रेसिंग रुममधील धक्कादायक रिपोर्ट )
तो बुमराह नाही?
जसप्रीत बुमराह सध्या टीमचा व्हाईस कॅप्टन आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये झालेल्या पर्थ टेस्टमध्ये तो टीमचा कॅप्टन होता. त्या टेस्टमध्ये टीम इंडियाला विजय मिळाला होता. पर्थ टेस्टपूर्वीही बुमराहनं भारतीय टीमचं नेतृत्त्व केलंय. त्यामुळे रोहितनंतर कॅप्टन म्हणून बुमराहचं नाव सर्वात आघाडीवर आहे.
पण, या रिपोर्टनुसार टीम इंडियातील एक सिनिअर खेळाडू बुमराहनं कॅप्टन म्हणून केलेल्या कामगिरीवर प्रभावित नाही, असे संकेत मिळत आहेत. या रिपोर्टमध्ये कोणत्याही खेळाडूचं नाव स्पष्टपणे दिलेलं नाही. पण, तो सिनिअर खेळाडू असल्याचा दावा करण्यात आलाय.
( नक्की वाचा : India cricket 2025 schedule : टीम इंडियाला 12 वर्षांनी संधी ! वाचा भारतीय टीमचं संपूर्ण वेळापत्रक )
टीम इंडियात सिनिअर खेळाडू मोजके आहेत. रोहित शर्मा सध्या कॅप्टन आहे. रोहितशिवाय विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा हे सिनिअर खेळाडू आहेत. त्यामधील विदेशातील टेस्टमध्ये जडेजाची जागा निश्चित नाही. राहुलचंही टीम इंडियामधील स्थान हे सतत अनिश्चित राहिलंय. त्याचबरोबर त्याला दुखापतींचाही इतिहास आहे.
रोहित शर्मा इतकाच टीम इंडियातील सिनिअर खेळाडू हा विराट कोहली आहे. तो रोहित शर्माच्यापूर्वी टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन होता. विराट कोहलीनं एकूण 68 टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व केलंय. त्यामध्ये 40 टेस्ट भारतानं जिंकल्या आहेत. 17 सामने गमावले तर 11 ड्रॉ झाले आहेत. विराट हा भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टन आहे. त्यामुळे त्याला नेतृत्त्व सिद्ध करण्याची गरज नाही. त्या परिस्थितीमध्ये Mr. Fix it हा विराट कोहली आहे की अन्य कुणी ही चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली आहे.