Team India schedule 2025 : टीम इंडियासाठी 2025 हे वर्ष संमिश्र ठरलं. भारतीय टीमनं इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज जिंकत वर्षाची सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर T20 वर्ल्ड कप जिंकत आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपला. पण, टीमला विजयी घौडदौड कायम राखता आली नाही. न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेली सीरिज भारतीय टीमनं गमावली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्येही टीम इंडिया 1-2 नं पिछाडीवर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय टीमनं या वर्षभरात 15 टेस्ट मॅच खेळल्या. त्यामध्ये 6 विजय, 8 पराभव आणि 1 ड्रॉ अशी टीमची कामगिरी होती. तर वर्षभरात खेळलेली एकमेव वन-डे सीरिज निराशाजनक ठरली. श्रीलंकेविरुद्धच्या त्या सीरिजमध्ये टीम इंडियानं सर्व सामने गमावले.
कसं असेल 2025?
टीम इंडिया वर्षाची सुरुवात सिडनी टेस्टनं करेल. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडं राखण्यासाठी भारताला सिडनी टेस्ट जिंकावीच लागेल. त्यानंतर भारतीय टीम फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी सुरु करेल.
( नक्की वाचा : आता खूप झालं ! गौतम गंभीरची विराट-रोहितसह संपूर्ण टीमला तंबी, ड्रेसिंग रुममधील धक्कादायक रिपोर्ट )
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज खेळेल. या सीरिजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (World Test Championship) चौथे पर्व सुरु होईल. त्यानंतर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया उतरेल. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या टीम देखील यावर्षी भारताचा दौरा करणार आहेत.
12 वर्षांनी संधी
टीम इंडियानं 2024 मध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकून आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसीची स्पर्धा जिंकण्याचं भारतीय टीमचं ध्येय असेल. 2017 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार होत आहे. पाकिस्तान आणि यूएईमध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जातील.
भारतानं यापूर्वी 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं होतं. तर 2017 साली या स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियाचा धक्कादायक पराभव झाला होता. आता 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी टीम इंडियाला आहे.
( नक्की वाचा : Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष? )
Team India's Full 2025 Cricket Schedule
भारतीय क्रिकेट टीमचं 2025 मधील संपूर्ण वेळापत्रक पाहा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 5 वी टेस्ट, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, 3 ते 7 जानेवारी (सिडनी)
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) 5 T20Is, 3 ODIs
पहिली T20 - 22 जानेवारी (चेन्नई)
दुसरी T20 - 25 जानेवारी (कोलकाता)
तिसरी T20 - 28 जानेवारी (राजकोट)
चौथी T20 - 31 जानेवारी (पुणे)
पाचवी T20 - 2 फेब्रुवारी (मुंबई)
पहिली वनडे - 6 फेब्रुवारी (नागपूर)
दुसरी वनडे - 9 फेब्रुवारी (कटक)
तिसरी वनडे - 12 फेब्रुवारी (अहमदाबाद)
( नक्की वाचा : World Record : 15 फोर आणि 11 सिक्स ! 17 वर्षांच्या मुंबईकरनं उडवली सर्व आयपीएल टीमची झोप )
चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy )
भारत विरुद्ध बांगलादेश - 20 फेब्रुवारी (दुबई)
भारत विरुद्ध पाकिस्तान - 23 फेब्रुवारी (दुबई)
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 2 मार्च (दुबई)
पहिली सेमी फायनल (पात्र झाल्यास) - 4 मार्च (दुबई)
दुसरी सेमी फायनल (पात्र झाल्यास) - 9 मार्च (दुबई)
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) 5 टेस्ट
पहिली टेस्ट - 20 ते 24 जून (हेडिंग्ले)
दुसरी टेस्ट - 2 ते 6 जुलै (एजबस्टन)
तिसरी टेस्ट - 10 ते 14 जुलै (लॉर्ड्स)
चौथी टेस्ट - 23 ते 27 जुलै ( मँचेस्टर)
पाचवी टेस्ट - 31 जुलै ते 4 ऑगस्ट (ओव्हल)
भारत विरुद्ध बांगलादेश - 3 वन-डे आणि 3 T20, ऑगस्ट, यजमान - बांगलादेश
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - 2 टेस्ट, ऑक्टोबर, यजमान - भारत
आशिया कप (T20) - ऑक्टोबर-नोव्हेंबर, यजमान - भारत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 3 वन-डे, 5 टी20 - नोव्हेंबर, यजमान - ऑस्ट्रेलिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 2 टेस्ट, 3 वन-डे, 5 T20 - नोव्हेंबर-डिसेंबर, यजमान - ऑस्ट्रेलिया
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world