IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांंधून उतरले मैदानात, 2 कारणं आली समोर

IND vs AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहितसोबत आश्विन आणि शुबमन गिलला संघात स्थान देण्यात आलं. परंतु भारताच्या डावाची सुरुवात काही चांगली झाली नाही. मिचेल स्टार्कने पहिल्याच बॉलवर यशस्वी जैस्वालला माघारी धाडलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना आज 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरु झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 मोठे बदल केले आहेत. आर अश्विनसह रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे संघात पुनरागमन झाले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघही पर्थमधील पराभव विसरुन जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आज हाताला काळ्या पट्टी बांधून मैदानात उतरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी हाताला काळा पट्टी का बांधली अशी चर्चा सुरु झाली आहे. 

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी डाव्या हाताला काळी पट्टी बांधून  दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युजेस याला श्रद्धांजली वाहिली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ह्युजेसचा सामन्यादरम्यान डोक्याला बाउन्सर बॉल लागल्याने दुःखद मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियन खेळाडू ॲडलेड कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी एक मिनिट मौन पाळतील. 

( नक्की वाचा : साराचं ठरलं! लाडक्या लेकीबाबत सचिननं केली मोठी घोषणा )

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी क्रिकेटपटूच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथे होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  

Advertisement

याशिवाय ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान रेडपाथ यांचे 1 डिसेंबर रोजी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.  त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडून काळी पट्टी बांधून मैदानात उतरले.

(नक्की वाचा-  धोनीशी 10 वर्षांपासून बोलत नाही, हरभजन सिंगचं धक्कादायक वक्तव्य)

टीम इंडियाची खराब सुरुवात

टॉस जिंकून भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहितसोबत आश्विन आणि शुबमन गिलला संघात स्थान देण्यात आलं. परंतु भारताच्या डावाची सुरुवात काही चांगली झाली नाही. मिचेल स्टार्कने पहिल्याच बॉलवर यशस्वी जैस्वालला माघारी धाडलं. 

Advertisement

यानंतर गिल आणि राहुल यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी 69 धावा जोडल्यानंतर लोकेश राहुल माघारी परतला. लोकेश राहुलने 37 रन्स केल्या. यानंतर भारतीय डावाला लागोपाठ दोन धक्के बसले. स्टार्कने विराट कोहलीला 7 धावांवर तर स्कॉट बोलंडने गिलला 31 धावांवर बाद केलं.

Topics mentioned in this article