Harbhajan Singh on MS Dhoni : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं महेंद्रसिंह धोनीबाबत धक्कादायक वक्तव्य केलं आहे. हरभजन धोनीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाकडून खेळलाय. 2007 मधील T20 वर्ल्ड कप आणि 2011 मधील वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा हरभजन सदस्य होता. त्याचबरोबर तो चेन्नई सुपर किंग्सकडूनही (CSK) खेळला आहे. पण, आपण गेल्या 10 वर्षांपासून धोनीशी बोलत नाही, असं वक्तव्य हरभजननं केलंय. त्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला हरभजन?
हरभजननं न्यूज 18 शी बोलताना सांगितलं, ' मी धोनीशी बोलत नाही. माझ्या मनात त्याच्या विरुद्ध काहीही नाही. त्याला काही विचारायचं असेल तर तो मला सांगू शकतो. पण, त्याला काही बोलायचं असतं तर तो आत्तापर्यंत माझ्याशी बोलला असता.'
हरभजननं धोनीबाबत पुढे म्हणाला की, 'मी सीएसकेकडून खेळत होतो त्यावेळी आम्ही बोलत होतो. पण, त्याशिवाय आम्ही कधी बोललो नाहीत. 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. माझ्याकडं कोणतं कारण नाही. कदाचित त्याच्याकडं कारण असेल. आम्ही सीएसकेकडून आयपीएल खेळत असताना आम्ही बोलत होतो. पण, ते मैदानापुरतंच मर्यादित होतं. त्यानंतर तो कधीही माझ्या खोलीत आला नाही. मी देखील त्याच्या खोलीत गेलो नाही.'
( नक्की वाचा : साराचं ठरलं! लाडक्या लेकीबाबत सचिननं केली मोठी घोषणा )
मी धोनीशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला काही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे मी त्यानंतर पुन्हा तो प्रयत्न सोडून दिला असे संकेत देखील हरभजननं दिले.
हरभजनच्या या वक्तव्यानं फॅन्समध्ये खळबळ उडाली आहे. हरभजन क्रिकेटमधून निवृत्त झाला असून तो सध्या कॉमेंट्री करतो. त्यानं भारताकडून 236 वन-डेमध्ये 269 तर 103 टेस्टमध्ये 417 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 28 T20 इंटरनॅशनलमध्ये 25 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world