IND vs ENG : गंभीरच्या लाडक्या शिष्यानं केली कमाल, आजवर कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते केलं!

India vs England 1st ODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे सीरिजला सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

India vs England 1st ODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वन-डे सीरिजला सुरुवात झाली आहे. या दोन टीममधील टी20 सीरिज टीम इंडियानं 4-1 अशा मोठ्या फरकानं जिंकली. त्यानंतर वन-डे सीरिजमध्ये देखील तशीच कामगिरी करण्याच्या निश्चयानं भारतीय टीम उतरली आहे.

आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफीपूर्वीची ही शेवटची सीरिज आहे. त्यामुळे या टीममध्ये अनुभवी खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये नागपूर वन-डे खेळण्यासाठी उतरलेल्या भारतीय टीममध्ये दोन नवोदीत चेहरे आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा या दोघांनी या सामन्याच्या माध्यमातून वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. टेस्ट सीरिजमध्ये सातत्यानं रन्स करणाऱ्या यशस्वीचं वन-डे पदार्पण संस्मरणीय झालं नाही. तो 22 बॉलमध्ये 15 रन काढून आऊट झाला. पण, हर्षित राणानं दमदार पदार्पण केलं आहे.

हर्षित राणानं आजवर कोणत्याही भारतीयाला न जमलेला रेकॉर्ड केला आहे. तो भारताकडं क्रिकेटच्या तीन्ही प्रकारातील पदार्पणाच्या सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला बॉलर (Harshit Rana Became First Indian Bowler To Took 3 Plus Wickets In All Formats Debut) बनला आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : IND vs ENG : विराट कोहली पहिल्या वन-डे मध्ये का नाही? रोहित शर्मानं सांगितलं कारण )

23  वर्षांच्या फास्ट बॉलरनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ टेस्टमध्ये पदार्पण केलं. त्या मॅचमध्ये त्यानं 48 रन्समध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या T20 सीरजमध्ये त्यानं पदार्पण केलं. पुण्यात झालेल्या सामन्यात त्यानं 33 रन्स देऊन तीन विकेट्स घेतल्या. आता वन-डे सामन्यातही त्यानं भेदक बॉलिंग केली आहे. हर्षितनं नागपूरमधील पदार्पणाच्या वन-डे सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. 

Advertisement

हर्षितनं बेन डकेट (32) च्या रुपानं पहिली विकेट घेतली. त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये हॅरी ब्रुकला (0) आऊट करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. हर्षितनं तिसरी विकेट ऑल राऊंडर लियाम लिविंगस्टोनची घेतली. लिविंगस्टोननं 5 रन केले. हर्षितनं 53 रन देत 3 विकेट्स घेतला. 

गौतम गंभीरचा विश्वासू

हर्षित राणा टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरचा विश्वासू बॉलर मानला जातो. गंभीर मेंटॉर असताना कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावले. या विजेतेपदात हर्षितचं मोलाचं योगदान होतं. याच कालखंडात गंभीरचा हर्षितवर विश्वास बसला. त्यानंतर गंभीर कोच झाल्यानंतर त्याला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पदार्पण करण्याची संधी मिळाली.
 

Advertisement
Topics mentioned in this article