जाहिरात

IND vs ENG : विराट कोहली पहिल्या वन-डे मध्ये का नाही? रोहित शर्मानं सांगितलं कारण

India vs England 1st ODI : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराटला फॉर्म गवसणे टीम इंडियासाठी आवश्यक आहे. पण, विराट कोहली पहिल्या वन-डेमध्ये खेळत नसल्यानं भारतीय फॅन्सचं टेन्शन वाढलंय.

IND vs ENG : विराट कोहली पहिल्या वन-डे मध्ये का नाही? रोहित शर्मानं सांगितलं कारण
मुंबई:

India vs England 1st ODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वन-डे सीरिजमधील पहिल्या लढतीला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरनं (Jos Buttler) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी (ICC Champions Trophy) ही शेवटची वन-डे सीरिज आहे. त्यामुळे याला मोठं महत्त्व आहे. नागपूरमधील पहिली वन-डे सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विराट कोहली का आऊट?

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि दिग्गज बॅटर विराट कोहलीचा (Virat Kohli) पहिल्या वन-डे साठी जाहीर झालेल्या प्लेईंग 11 मध्ये समावेश नव्हता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीला एका सेंच्युरीचा अपवाद वगळता मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती.

पण, वन-डे फॉरमॅट हा विराटच्या खेळासाठी सर्वात योग्य मानला जातो. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सेंच्युरी झळकावण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी विराटला फॉर्म गवसणे टीम इंडियासाठी आवश्यक आहे. पण, विराट कोहली पहिल्या वन-डेमध्ये खेळत नसल्यानं भारतीय फॅन्सचं टेन्शन वाढलंय.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं विराट कोहलीचा समावेश का करण्यात आला नाही याचं कारण सांगितलं. विराट कोहलीला काल रात्रीपासून गुडघ्याची समस्या जाणवत आहे. त्यानं सरावाच्या वेळी देखील उजव्या गुडघ्याला पट्टी बांधली होती. तसंच सावधगिरीनं सराव केला. त्यामुळे त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला नसल्याचं रोहितनं स्पष्ट केलं.

Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का, चॅम्पियन होण्याचं स्वप्न जवळपास समाप्त!

( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का, चॅम्पियन होण्याचं स्वप्न जवळपास समाप्त! )

2 जणांचे पदार्पण

नागपूरमध्ये सुरु असलेल्या वन-डे सामन्यात टीम इंडियाकडून दोन जणांनी पदार्पण केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात रन्स करणाऱ्या यशस्वी जैस्वालला वन-डेमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या टीममध्ये यशस्वीची निवड करण्यात आली आहे. पण, तो आजवर एकही वन-डे सामना खेळला नव्हता. त्याचं बहुप्रतीक्षित वन-डे पदार्पण अखेर झालं. 

तर, फास्ट बॉलर हर्षित राणानंही वन-डेमध्ये पदार्पण केलं आहे. जसप्रीत बुमराह अनफिट असल्यानं त्याच्या जागी हर्षितचा समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियाची Playing 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), केएल राहुल (विकेट किपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि मोहम्मद शमी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: