IND vs ENG: लॉर्ड्स टेस्टमध्ये इतिहास घडणार! 4 भारतीय खेळाडूंची महारेकॉर्डवर नजर

IND vs ENG 3rd Test:  लॉर्ड्सवर 73 वर्षांपासून अबाधित असलेला रेकॉर्ड मोडण्याची संधी 4 भारतीयांना आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्स टेस्टमध्ये 73 वर्षांपासून हा विक्रम अबाधित आहे.
मुंबई:

Most Runs By Indian Batter at Lord's Record IND vs ENG 3rd Test:  टीम इंडियाने एजबेस्टन येथे इंग्लंडविरुद्ध 336 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयामुळे पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे भारताचा आत्मविश्वास वाढलेला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. दोन्ही टीम सध्या बरोबरीत असल्यानं लॉर्ड्स टेस्टला मोठं महत्क्व आहे.

एजबस्टनमध्ये टीम इंडियाने आपला दुसरी इनिंग 6 आऊट 427 वर घोषित करत इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे लक्ष्य दिले, पण इंग्लंडची दुसरी इनिंग 271 वर संपुष्टात आली आहे. त्यामुळे 10 जुलै रोजी लॉर्ड्समध्ये होणारी टेस्ट जिंकत मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

लॉर्ड्स संबंधी खास आठवणी

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानाशी भारताच्या अनेक सुवर्ण आठवणी जोडलेल्या आहेत. 1983 मध्ये इथेच भारताने विश्वचषक जिंकला होता, तर 2002 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला होता. भारताने लॉर्ड्सवर 1932 मध्ये पहिली टेस्ट मॅच खेळली होती. 

कपिल देवच्या नेतृत्वाखाली 1986 मध्ये भारताने लॉर्ड्समध्ये पहिल्यांदा टेस्ट मॅच जिंकली होती, ज्यात शास्त्री, गावस्कर, अमरनाथ आणि बिन्नी यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. त्यानंतर भारताने इथे फक्त आणखी दोन टेस्ट जिंकले आहेत.

Advertisement

( नक्की वाचा :  Shubman Gill : शुबमन गिलनं घडवला इतिहास, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडला! )

लॉर्ड्स टेस्टमध्ये भारत-इंग्लंड आमने-सामने

एकूण टेस्ट: 19

इंग्लंडचा विजय: 12

भारताचा विजय: 3

ड्रॉ: 4

4 खेळाडूंचे महारेकॉर्डवर लक्ष

शुभमन गिलने या मालिकेत कॅप्टन म्हणून शानदार सुरुवात केली आहे. त्यानं पहिल्या टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावली होती. तर दुसऱ्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 269 तर दुसऱ्या इनिंगमद्ये 161 रन्स केले होते. एकाच टेस्टमध्ये 430 रन्स करत तो भारताकडून एकाच टेस्टमध्ये सर्वात जास्त रन्स करणारा भारतीय बॅटर बनला आहे. 

गिलचा सध्याची कामगिरी पाहाता 1952 पासून अबाधित असलेला एक महारेकॉर्ड तो लॉर्ड्सवर मोडू शकतो. 1952 साली विनू मंकड यांनी लॉर्ड्स टेस्टमध्ये 184 रन्स केले होते. लॉर्ड्स टेस्टमध्ये आजवर कोणत्याही भारतीयानं केलेला हा वैयक्तिक सर्वोच्च स्कोअर आहे. हा रेकॉर्ड मागे टाकण्याची गिलला संधी आहे.

Advertisement

पण, शुबमन गिलच नाही तर यशस्वी जैस्वाल, केएल राहुल आणि ऋषभ पंत हे देखील भारतीय बॅटर सध्या फॉर्मात आहेत. त्यामुळे ते देखील विनू मंकड यांचा 73 वर्ष अबाधित असलेला रेकॉर्ड मोडू शकतात. 
 

Topics mentioned in this article