Shubman Gill Press Conference IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून पहिली टेस्ट सुरु होत आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्त्व करतोय. या सीरिजमध्ये एकूण पाच टेस्ट मॅच खेळल्या जाणार आहेत. त्यामधील पहिली टेस्ट इंग्लंडमधील ऐतिहासिक हेडिंग्ले (लीड्स) मैदानावर होणार आहे. या मॅचनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या नव्या चक्राला सुरुवात होईल.
शुबमन गिलचं मोठं वक्तव्य
हेंडिग्ले टेस्टपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना गिल म्हणाला की, 'या टेस्ट सीरिजमध्ये सर्वोत्तम बॅटर होण्याची माझी इच्छा आहे. आम्ही या सीरिजमध्ये कोणत्या शैलीतील क्रिकेट खेळणार आहोत, हे पाहण्यासाठी तुम्हाला ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल.
इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकणे हे आयपीएल जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे, असं मोठं वक्तव्य गिलनं यावेळी केलं.