
Shubman Gill Press Conference IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात 20 जूनपासून पहिली टेस्ट सुरु होत आहे. रोहित शर्मानं (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्त्व करतोय. या सीरिजमध्ये एकूण पाच टेस्ट मॅच खेळल्या जाणार आहेत. त्यामधील पहिली टेस्ट इंग्लंडमधील ऐतिहासिक हेडिंग्ले (लीड्स) मैदानावर होणार आहे. या मॅचनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या नव्या चक्राला सुरुवात होईल.
शुबमन गिलचं मोठं वक्तव्य
हेंडिग्ले टेस्टपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना गिल म्हणाला की, 'या टेस्ट सीरिजमध्ये सर्वोत्तम बॅटर होण्याची माझी इच्छा आहे. आम्ही या सीरिजमध्ये कोणत्या शैलीतील क्रिकेट खेळणार आहोत, हे पाहण्यासाठी तुम्हाला ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागेल.
"You're going to have to wait until August to see what kind of style it's going to be" 👀⏳
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 19, 2025
Are Shubman Gill and India inspired by 'Bazball'? 🤔 pic.twitter.com/C4mBdHLPEy
इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकणे हे आयपीएल जिंकण्यापेक्षा मोठी गोष्ट आहे, असं मोठं वक्तव्य गिलनं यावेळी केलं.
Shubman Gill says winning a Test series in England is bigger than winning the IPL 🏏 pic.twitter.com/WkVrIo2oJe
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 19, 2025
टेस्ट टीमचा कॅप्टन होण्याबद्दल...
टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून जबाबदारी मिळाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कॅप्टन गिलनं सांगितलं की, 'ही कोणत्याही खेळाडूसाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे.'
( नक्की वाचा : IND vs ENG : 'कर्म कधीच माफ करत नाही' टीम इंडियातून वगळलेल्या खेळाडूचा हेड कोच गंभीरवर निशाणा? )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world