IND vs NZ : पुन्हा पराभवाचं सावट, टीम इंडियावर 12 वर्षांनी येणार नको ती वेळ?

India vs New Zealand LIVE Score, 2nd Test, Day 2: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पुण्यात सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Virat Kohli, India vs New Zealand
मुंबई:

India vs New Zealand LIVE Score, 2nd Test, Day 2: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पुण्यात सुरु असलेल्या टेस्टमध्ये टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारतीय टीम 156 रन्सवरच ऑल आऊट झाली. पाहुण्या टीमला पहिल्या इनिंगमध्ये 103 रनची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. भारतीय बॅटर्सच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडिया टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पराभवाच्या सावटाखाली आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रथी-महारथी अपयशी

पुणे टेस्टच्या पहिल्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरनं 7 विकेट्स घेत न्यूझीलंडला 259 रन्सवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वॉशिंग्टनच्या या 'सुंदर' कामगिरीचा फायदा टीम इंडियाच्या बॅटर्सना उठवा आला नाही. कॅप्टन रोहित शर्मा पहिल्याच दिवशी शून्यावर आऊट झाला.

दुसऱ्या दिवशीही भारतीय बॅटर्सचा निराशाजनक खेळ कायम होता. माजी कॅप्टन विराट कोहली देखील फक्त 1 रन काढून आऊट झाला. बंगळुरु टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सेंच्युरी करणारा सर्फराज खाननं फक्त 11 रन केले. तर संकटमोचक ऋषभ पंत 18 रन काढून आऊट झाला.

भारताकडून पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक रन रविंद्र जडेजानं केले. त्यानं 7 क्रमांकावर बॅटिंग करत 46 बॉलमध्ये 38 रन काढले. न्यूझीलंडला अडकवण्यासाठी स्पिन बॉलिंगला मदत करणारं पिच बनवण्याची बीसीसीआयची योजना टीम इंडियाच्याच अंगाशी आली. न्यूझीलंडच्या मिचेल स्टँनरनं पिचचा पूर्ण फायदा घेत 7 विकेट्स घेतल्या. ग्लेन फिलिप्सनं 2 आणि टीम साऊदीनं 1 विकेट्स घेत भारतीय टीमला रोखण्यात मोलाचं योगदान दिलं.

12 वर्षांनंतर संकट 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली टेस्टमध्येही टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव झाला होता. बंगळुरु टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये भारतीय टीम 46 रनवरच ऑल आऊट झाली. या लाजीरवाण्या कामगिरीचा फटका टीमला बसला. दुसऱ्या इनिंगमध्ये 462 रन केल्यानंतरही टीम इंडियाला सामना गमावावा लागला.

बंगळुरुतील पराभावानंतर भारतीय टीमनं प्लेईंग 11 मध्ये 3 बदल केले. केएल राहुल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजच्या जागी शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाशदीपचा समावेश केला. पण, भारतीय बॅटर्सच्या निराशेमुळे टीम इंडिया संकटात सापडली आहे.

( नक्की वाचा : 'भैय्या, मी सांगतोय ना...' विराट, पंत तयार नव्हते, पण सर्फराजनं केला आग्रह, आणि... Video )

भारतानं यापूर्वी 2012 साली इंग्लंडविरुद्ध मायदेशात टेस्ट सीरिज गमावली होती. त्यानंतर तब्बल 12 वर्ष भारतीय टीम घरच्या मैदानावर एकही सीरिज हरलेली नाही. ही परंपरा कायम राखण्यासाठी पुणे टेस्टमध्ये काहीतरी अभूतपूर्व करण्याचं आव्हान रोहित शर्मा आणि कंपनीवर आहे.