IND VS NZ: प्रतिष्ठेचा प्रश्न! सीरिज वाचवण्यासाठी टीम इंडियामध्ये होणार 3 बदल?

India vs New Zealand, 2ndTest : न्यूझीलंडच्या विजयानंतर टीम इंडियासमोर सीरिज वाचवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मानसी पिंगळे, प्रतिनिधी 

India vs New Zealand, 2ndTest : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन टेस्ट मॅचच्या सीरिजची सुरुवात धक्कादायक झाली आहे. बंगळुरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 विकेट्सनं पराभव केला. भारतामध्ये टेस्ट मॅच जिंकण्याचा दुष्काळ संपवलाय. न्यूझीलंडच्या या विजयानंतर टीम इंडियासमोर सीरिज वाचवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. ही सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडियाला पुण्यात गुरुवार (24 ऑक्टोबर ) पासून सुरु होणारी दुसरी टेस्ट जिंकावी लागेल.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पुणे टेस्टमध्ये भारतीय टीममध्ये 3 बदल होऊ शकतात. 

बंगळुरु टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया 46 रनवरच ऑल आऊट झाली. टीम इंडियाचे बॅटर पहिल्या इनिंगमध्ये फेल गेलेच,  पण बॉलर्सही काही खास करू शकले नाहीत. त्यानंतर उर्वरित दोन टेस्टसाठी वॉशिंग्टन सुंदरचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय.

सुंदरनं यापूर्वी 2021 साली टेस्ट मॅच खेळली होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उपयुक्त ऑल राऊंडर म्हणून लौकीक मिळवलेल्या सुंदरचा पुणे टेस्टमध्ये कुलदीप यादवच्या जागी समावेश होऊ शकतो. त्याचबरोबर कुलदीपच्या जागी खेळवण्यासाठी अक्षर पटेल हा पर्याय देखील टीम मॅनेजमेंटसमोर आहे. 

शुबमन गिल बंगळुरु टेस्ट मानेच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. गिलचंही पुणे टेस्टमध्ये पुनरागमन होऊ शकतं. फॉर्मसाठी झगडणाऱ्या केएल राहुलच्या जागी गिलचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. टीम मॅनेजमेंटला तिसरा बदल नाईलाजानं करावा लागू शकतो. विकेटकिपर बॅटर ऋषभ पंतला बंगळुरु टेस्टमध्ये दुखापत झाली होती. त्यानं दुखापतीनंतरही दुसऱ्या इनिंगमध्ये झुंजार खेळ करत 99 रन केले. पंतला खबरदारीचा उपाय म्हणून विश्रांती दिली जाऊ शकते. तसं झालं तर ध्रुव जुरेल हा पर्याय टीम मॅनेजमेंटकडं आहे. 

( नक्की वाचा :  IND vs NZ : रोहित आणि विराटनं घातला अंपायरशी वाद! न्यूझीलंडचे खेळाडू निघून गेले! )

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (व्हाईस कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर
 

Topics mentioned in this article