
India vs New Zealand 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील बंगळुरु टेस्टचा चौथा दिवस चांगलाच नाट्यमय ठरला. सर्फराज खानची दमदार सेंच्युरी (150) आणि ऋषभ पंत (99) यांनी दमदार खेळी करत टाम इंडियाला संकटातून बाहेर काढलं. यापूर्वी टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 46 तर न्यूझीलंडनं 402 रन काढले. पाहुण्या टीमनं शेवटच्या सेशनमध्ये जोरदार कमबॅक केलं. त्यांनी 54 रनमध्ये सात विकेट्स घेतल्या. त्यामुळे न्यूझीलंडला ही टेस्ट जिंकण्यासाठी 107 रनचं टार्गेट मिळालं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेवटच्या सत्रात ड्रामा
न्यूझीलंडचे ओपनर टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे चौथ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आले. भारताकडून जसप्रीच बुमराहनं पहिली ओव्हर टाकण्यास सुरुवात केली. बुमराहनं त्या ओव्हरमध्ये फक्त चार बॉल टाकले. त्यामध्ये त्यानं लॅथमला चांगलंच त्रस्त केलं. त्याचवेळी अंपायरनं घेतलेल्या एका निर्णयामुळे वातावरण बदललं.
Virat Kohli and Rohit Sharma are unhappy with the umpire's decision to pause play due to bad light. Ashwin should have come into the debate with his cricket knowledge. 😂#INDvsNZL #INDvsNZ #INDvNZ pic.twitter.com/hrRzFlAAlA
— Tejash (@Cricmemer45) October 19, 2024
मैदानातील अंपायरनं न्यूझीलंडच्या बॅटर्सना खेळण्यासाठी योग्य सूर्यप्रकाश नसल्याचं सांगतं खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. अंपायरचा हा निर्णय टीम इंडियाला आवडला नाही. कॅप्टन रोहित शर्मानं या निर्णयावेळी अंपायरनं वाद घातला. विराट कोहलीनंही यावेळी रोहितला साथ दिली.
The umpire is asking the players to go off due to bad light. Rohit Sharma & Virat Kohli are not happy 😭😭😭#INDvNZ #tapmad #DontStopStreaming pic.twitter.com/vkn2oq93OE
— Mubashir hassan (@Mubashirha88911) October 19, 2024
सर्फराज-पंत चमकले
बंगळुरु टेस्टच्या चौथ्या दिवशी सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांच्या खेळीनं टीम इंडियाच्या आशा जागवल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 177 रनची दमदार पार्टनरशिप केली. सर्फराजनं टेस्ट कारकिर्दीमधील पहिली सेंच्युरी केली. तो 150 रनवर आऊट झाला. तर ऋषभ पंतची सेंच्युरी फक्त 1 रननं हुकली. पण, ते दोघं आऊट होताच यजमान टीमची लय हरवली.
( नक्की वाचा : IND vs NZ 1st : अरेरे... ऋषभ पंत ठरला दुर्दैवी, बंगळुरुमध्ये जे घडलं ते वाचून तुम्हालाही वाटेल वाईट )
चौथ्या दिवशी टी टाईमच्या वेळी टीम इंडियाचा स्कोअर 6 आऊट 438 होता. टी टाईमनंतर शेवटच्या चार विकेट्स झटपट आऊट केलं. रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज लगेच आऊट झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world