जाहिरात

IND Vs NZ: टीम इंडियाचे धुरंधर फेल! न्यूझीलंडसमोर 250 धावांचे आव्हान; अय्यर- पांड्याची झुंझार खेळी

टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 249 धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यरने झुंजार अर्धशतकी खेळी केली. 

IND Vs NZ: टीम इंडियाचे धुरंधर फेल! न्यूझीलंडसमोर 250 धावांचे आव्हान; अय्यर- पांड्याची झुंझार खेळी

India Vs New Zealand Champions Trophy 2025:  चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ग्रुप स्टेजचा अखेरचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पार पडत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यात 249 धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यरने झुंजार अर्धशतकी खेळी केली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाला तिसऱ्याच षटकात शुभमन गिल आऊट झाल्याने पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा 15 धावांवर आणि विराट कोहली 30  धावांवर आऊट झाला. तीन दिग्गज आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने चौथ्या विकेटसाठी 98 धावांची ूभागिदारी केली. 

यामध्ये श्रेय्यस अय्यरने अर्धशतक झळकावले.  श्रेयस अय्यरने 98 चेंडूंमध्ये 79 धावांची खेळी केली. त्याला अक्षर पटेलने 42 धावा ठोकत साथ दिली. शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याने जोरदार फटके लगावत 45 धावा ठोकल्या. या फलंदाजांच्या जोरावर टीम इंडियाने 249 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून एम हेनरीने सर्वाधिक पाच बळी घेतले. 

ट्रेंडिंग बातमी - रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कोण? CM फडणवीसांच्या प्रतिक्रियेने राजकारणात खळबळ; म्हणाले...

दरम्यान,  भारत आणि न्यूझीलंडमधील हा सामना जिंकणारा संघ ग्रुप अ मध्ये अव्वल स्थानावर राहील आणि सेमीफायनलमध्ये ग्रुप ब मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाशी सामना करेल. भारत आणि न्यूझीलंडने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकले आहेत.

भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंडचा संघ: विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क.