India vs Pakistan, U19 Asia Cup 2024: दुबईत सुरु असलेल्या अंडर 19 आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा पाकिस्ताकडून 43 रननं पराभव झाला. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करताना पाकिस्ताननं 50 ओव्हर्समध्ये 7 आऊट 281 रन केले. भारतीय टीमनं खराब सुरुवातीनंतरही 282 रन्सचं आव्हान पेलण्याचा निकारानं प्रयत्न केला. पण भारतीय टीम 47.1 ओव्हर्समध्ये 238 रनवरच ऑल आऊट झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निखिल कुमार अपयशी
भारताकडून मुंबईकर आयुष म्हात्रेनं आत्मविश्वानं सुुरुवात केली होती. त्यानं 5 चौकार लगावले. पण, आयुषला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. तो 20 रनवर आऊट झाला. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये करोडपती झालेल्या वैभव सूर्यवंशीकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.
बिहारच्या 13 वर्षांच्या वैभवला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं होतं. पण, वैभवनं निराशा केली. तो फक्त 1 रन काढून आऊट झाला. सी. सिद्धार्थ (15), मोहम्मद आमन (16) झटपट आऊट झाले. टॉप ऑर्डर आऊट झाल्यानंतर निखिल कुमारनं एकाकी झुंज दिली. त्यानं 77 बॉलमध्ये 67 रन काढले. निखिलचे प्रयत्न अखेर अपुरे ठरले. पाकिस्तानकडून अली रझानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : 13 वर्षांच्या मुलाची आयपीएलमध्ये एन्ट्री, भारताकडून झळकावलीय सेंच्युरी )
शाहझैब खानची सेंच्युरी
पाकिस्तानच्या ओपनर्सनी सुरुवात दमदार केली. शाहझैब खान आणि उस्मान खान यांनी पहिल्या विकेटसाठी 160 रनची भागिदारी केली. आयुष म्हात्रेनं उस्मानला 60 रनवर आऊट करत ही जोडी फोडली. पाकिस्तानकडून शाहझैबनं सेंच्युरी झळकावली. त्यानं 147 बॉलमध्ये 159 रनची दमदार खेळी केली.