कुणाला रडू कोसळलं, तर कुणी निराश मैदानात बसलं; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे Photos

T 20 World Cup Final : क्लासेनने पाचव्या अवघ्या 27 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी करत, कोट्यवधी भारतीयांचा धाकधूक वाढवली होती. त्याने या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकार लगावले.

जाहिरात
Read Time: 2 mins

South African cricketers saddened by defeat: टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंचा जल्लोष सुरु आहे. दुसरीकडे पहिल्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूना मैदानातच रडू कोसळलं. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी वाटणारा विजय भारताने खेचून आणला. अखेरच्या क्षणी सामना फिरवत दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरीक क्लासेनने सामना एकतर्फी फिरवला होता. मात्र त्याच्या विकेटनंतर दक्षिण आफ्रिकेच्या हातून सामना निसटला. मात्र पराभवानंतर क्लासेनला अश्रू अनावर झाले.

(नक्की वाचा -Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप?)

क्लासेनने पाचव्या अवघ्या 27 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी करत, कोट्यवधी भारतीयांचा धाकधूक वाढवली होती. त्याने या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकार लगावले. मात्र क्लासेनची ही खेळी दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाने व्यर्थ गेली. 

Advertisement

क्लासेनसोबतच डेविड मिलर देखील सामन्यानंतर दु:खी दिसला. मिलर अत्यंत निराश मैदानात बसलेला दिसला. ज्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला धीर दिला. क्लिंटन डी कॉकजवळ जात ऋषभ पंतने त्याला धीर दिला. कर्णधार एडन मार्करमदेखील पराभवानंतर निराश दिसला. मार्करमला देखील अश्रू अनावर झाले. 

(नक्की वाचा -  Rohit Sharma Retirement: विराटनंतर कॅप्टन रोहित शर्माची T20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीची घोषणा )

Advertisement

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेला लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 169 धावाच करता आल्या. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. अशारितीने भारताने तब्बल 17 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. 

Topics mentioned in this article