IND vs SL : 'सूर्या'च्या बॉलिंगनं दाखवले लंकेला 'तारे', टीम इंडियाचा सुपर ओव्हरमध्ये विजय, Video

IND vs SL T20 Series : T20 इंटनॅशनल क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही बॉलिंग न केलेल्या दोन बॉलर्सनी शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये कमाल करत टीम इंडियाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.

Advertisement
Read Time: 2 mins
S
मुंबई:

IND vs SL T20 Series : टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय टीमनं ही मालिका 3-0 या फरकानं जिंकली. तिसऱ्या सामन्यात बहुतेक काळ श्रीलंकेचं वर्चस्व होतं.  लंकेला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी फक्त 9 रनची आवश्यकता होती. त्यावेळी T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधीही बॉलिंग न करणाऱ्या दोन बॉलर्सनी हा सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारतानं सहज विजय मिळवत, या सीरिजमध्ये निर्भेळ यश मिळवलं.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रिंकू, सूर्याची बॉलिंगमध्ये कमाल

श्रीलंकेला विजयाची फक्त औपचारिकता बाकी आहे, असं वाटत होतं त्यावेळी कॅप्टन सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) रिंकू सिंहला (Rinku Singh) 19 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग दिली. रिंकूनं यापूर्वी T20 इंटरनॅशनलमध्ये कधीही बॉलिंग केली नव्हती. त्यानं 19 व्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन देत 2 विकेट्स घेतल्या. 

श्रीलंकेला शेवटच्या 6 बॉलमध्ये फक्त 6 रन हवे होते. मोहम्मद सिराजची एक ओव्हर शिल्लक असूनही कॅप्टन सूर्यानं स्वत: बॉलिंग घेतली. रिंकू प्रमाणेच सूर्यानंही कधी T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधीही बॉलिंग दिली नव्हती. निर्णायक क्षणी कॅप्टननं दाखवलेलं धाडस मास्टरस्ट्रोक ठरला. सूर्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन देत 2 विकेट्स घेतल्या. महत्त्वाचं म्हणजे त्यानं श्रीलंकेला बरोबरीत रोखत सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

Advertisement

 सुपर ओव्हरमध्ये सहज विजय

वॉशिंग्टन सुंदरनं सुपर ओव्हरमध्ये सुरुवात वाईड बॉलनं केली. पण, त्यानंतर त्यानं फक्त 1 बॉलमध्ये 2 विकेट्स घेत यजमानांना 2 रनवर रोखलं. भारताला विजयासाठी 3 रनची गरज होती. सूर्यकुमार यादवनं पहिल्याच बॉलवर फोर लगावत विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

( नक्की वाचा : IND vs SL : नव्या जबाबदारीत 'सूर्या' तळपला, टीम इंडियाच्या कॅप्टनचा लंकेला तडाखा, Video )

वॉशिंग्टन सुंदरला सामनावीर तर सूर्यकुमार यादवला मालिकावीर म्हणून पुरस्कारानं गौरवण्यात आलं.