टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कामगिरी दमदार होत आहे. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये बुमराहनं रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये कॅप्टनसी सांभाळली होती. त्या टेस्टमध्ये बुहराहनं 8 विकेट्स घेत टीमच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. अॅडलेडमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये त्यानं चार विकेट्स घेतल्या. सध्या ब्रिस्बेनमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये बुमराहनं 6 विकेट्स घेतल्या आहेत.
बुुमराहच्या दमदार कामगिरीनंतरही ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडिया अडचणीत आहे. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या 445 रनला उत्तर देताना टीम इंडियाची अवस्था 4 आऊट 51 अशी झाली आहे. भारतीय बॅटर्सच्या खराब कामगिरीचं समर्थन केलं. भारताच्या बॅटिंगवर ऑस्ट्रेलियन मीडियानं विचारलेल्या प्रश्नाला बुमराहनं शिताफीनं उत्तर देत त्यांना निरुत्तर केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय घडलं?
तिसऱ्या दिवसानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बुमराहला भारतीय बॅटींगबद्दल पत्रकारानं प्रश्न विचारला. 'भारतीय बॅटिंगबाबत तुझं आकलन काय आहे? अर्था तू हे उत्तर देण्यासाठी योग्य व्यक्ती नाहीस. पण, गाबा टेस्टमधील टीमच्या सध्याच्या परिस्थितीबाबत तुला काय वाटतं?' असा प्रश्न त्याला पत्रकारानं विचारला.
बुमराह त्याला उत्तर देताना म्हणाला, 'हा चांगला प्रश्न आहे. पण, तू माझ्या बॅटिंगच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करतोय. टेस्ट क्रिकेटमधील एका ओव्हरमध्ये सर्वात जास्त रन काढणारा कोण आहे, हे तू गूगल केलं पाहिजेस, ' असं उत्तर बुमराहनं दिलं.
( नक्की वाचा : आऊट होण्याचा हा काय प्रकार? केन विल्यमसनची विकेट पाहून डोक्याला लावाल हात, Video )
टेस्ट क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. त्यानं 2022 साली इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये 35 रन काढले होते. बुमराहचा हा रेकॉर्ड आजही अबाधित आहे.
टीमच्या बॅटिंगवरील प्रश्नाला बुमराहनं नंतर सविस्तर उत्तर दिलं. 'आम्ही टीम म्हणून एकमेकांकडं बोट दाखवत नाही. तू हे केलं पाहिजेस, तू हे करावसं... असं एकमेकांना सांगण्याच्या मानसिकतेमध्येही आम्हाला जायचं नाही.
( नक्की वाचा : Champions Trophy 2025 : भारत आणि पाकिस्तानमध्ये तोडगा निघाला, 'या' पद्धतीनं होणार सामने )
आम्ही एक टीम म्हणून स्थित्यंतराच्या प्रक्रियेतून जात आहोत. नवे खेळाडू येत आहेत. क्रिकेट खेळण्यासाठी ही सोपी जागा नाही. इथं वेगळं वातावरण आहे. या विकेटचंही वेगळं आव्हान आहे, असं त्यानं यावेळी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world