जाहिरात

Ind Vs Aus: थर्ड अंपायरची चीटिंग ? चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने यशस्वी जैस्वाल भडकला

एकीकडे सर्व आघाडीचे फलंदाज तंबुत गेले असताना यशस्वी जैस्वालने एकहाती किल्ला सांभाळला होता. मात्र त्याच्या विकेटवरुन सामन्यात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. 

Ind Vs Aus: थर्ड अंपायरची चीटिंग ? चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने यशस्वी जैस्वाल भडकला

India Vs Australia test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मेलबर्न कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाने 340 धावांचे लक्ष दिले होते. मात्र आघाडीच्या फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियाचा डाव अवघ्या 155 धावांवर आटोपला. एकीकडे सर्व आघाडीचे फलंदाज तंबुत गेले असताना यशस्वी जैस्वालने एकहाती किल्ला सांभाळला होता. मात्र त्याच्या विकेटवरुन सामन्यात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. 

मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान सलामीवीर यशस्वी जैस्वालला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याने मोठा वाद झाला. झालं असं की, ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स 71 वे षटक टाकण्यासाठी आला आणि त्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर यशस्वीने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीच्या हातात गेला आणि ऑस्ट्रेलियन संघाने अपील केले.

यशस्वीने कमिन्सच्या लेग साईडला शॉर्ट पिच बॉल फाईन लेगवर खेळण्याचा प्रयत्न केला. तो चुकला आणि चेंडू यष्टीरक्षक कॅरीच्या हातात गेला. मैदानावरील पंचांनी यशस्वीला आऊट दिले नाही, त्यानंतर कमिन्सने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. बॉलने यशस्वीच्या बॅटची कड घेतली की नाही हे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले नाही. त्यानंतर स्निको मीटरने त्याची तपासणी केली असता स्निको मीटरमध्ये कोणताही स्पर्श दिसून आला नाही. असे असतानाही थर्ड अंपायरने मैदानावरील पंचाचा निर्णय झुगारून यशस्वीला बाद घोषित केले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मैदानावरील पंचाचा निर्णय थर्ड अंपायरने बदल्याने समालोचन करणाऱ्या सुनील गावसकर आणि इरफान पठाण यांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. गावस्कर यांनी स्निको मीटरचाही उल्लेख केला आणि सांगितले की स्निको मीटरने हालचाल दाखवली नाही तर चेंडूने बॅटची कड घेतली नसल्याचा पुरावा आहे. त्याचवेळी इरफानही गावस्कर यांच्याशी सहमत असल्याचे दिसून आले.

एमसीजीमध्ये उपस्थित असलेल्या 30,000 हून अधिक प्रेक्षकही पंचांच्या या निर्णयाने आश्चर्यचकित झाले. यामुळे भारतीय चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आणि त्यांनी चिटींग झाल्याच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यशस्वीच्या विकेटनंतर प्रेक्षक बराच वेळ घोषणा देत राहिले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com