
Rohit Sharma vs Shreyas Iyer Viral Video : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनेड सीरिजचा थरार सुरू असून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. या धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 265 धावांचं आव्हान ठेवलं. दोघांनीही अप्रतिम खेळी करून धावांचा डोंगर रचला. दोघांनाही शतकापर्यंत पोहोचता आलं नाही, पण दोघांनी त्यांच्या इनिंगने भारताला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. या दोन्ही फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पण फलंदाजी दरम्यान दोघांमधअये रन्स घेण्यावरून थोडी बाचाबाची झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
भारतीय इनिंगच्या 14 व्या षटकात जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर रोहितने रन घेण्याचा प्रयत्न केला. पण नॉन स्ट्रायकर एंडवर असलेल्या श्रेयस अय्यरने धावा काढण्यास नकार दिला. त्यानंतर रोहित अय्यरला म्हणाला, इथे सिंगल रन झालं असतं.दोघांमध्ये झालेलं बोलणं कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
दोघांमध्ये काय झालं बोलणं?
रोहित : अरे श्रेयस..हे सिंगल होतं.
अय्यर : तू घेऊन बघ..नंतर मला बोलू नको.
रोहित : तुला आधी कॉल करावा लागेल. तो (हेजलवूड) सातवं षटक टाकत आहे.
अय्यर : मला नाही माहित की, तो कोणत्या अँगलने धावत आहे. कॉल कर.
रोहित : मी तुला तो कॉल देऊ शकत नाही.
अय्यर : हे तुझ्या समोर आहे.
इथे पाहा श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माचा व्हायरल व्हिडीओ
Stump mic captures Rohit Sharma vs Shreyas Iyer 🤣🙌
— Star Sports (@StarSportsIndia) October 23, 2025
Whose call was it really?✍🏻👇#AUSvIND 👉 2nd ODI | LIVE NOW 👉 https://t.co/dfQTtniylt pic.twitter.com/YipS5K9ioa
सामन्याबाबत बोलायचं झालं तर, रोहित शर्माने वनडे करिअरमध्ये 59 वं अर्धशतक ठोकलं. रोहितने 97 चेंडूत 73 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर अय्यरने कमान सांभाळली. त्याने 77 चेंडूत 7 चौकारांसह 61 धावांची खेळी केली. पाचव्या नंबरवर फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलने 41 चेंडूत 44 धावा केल्या.
या इनिंगमध्ये त्याने 5 चौकार मारले. भारतीय संघाने 226 च्या धावसंख्येवर 8 विकेट्स गमावल्या होत्या. हर्षित राणाने (नाबाद 24), अर्शदीप सिंहने अखेरच्या षटकांमध्ये (13) धावा करून भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. ऑस्ट्रेलियाकडून एडम झंम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेवियर बार्टलेटने 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्कला 2 विकेट्सवर समाधान मानावं लागलं.
नक्की वाचा >> Video : ऑस्ट्रेलियाच्या युवा खेळाडूची विराटवर होती करडी नजर..हवेत उडी मारून घेतला आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world