IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत ॲम्ब्युलन्सने मैदानाबाहेर, वाचा नेमकं काय घडलं? Video

India vs England Live Score, 4th Test Match Day 1: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी सीरिजमधील चौथी टेस्ट मँचेस्टरमध्ये सुरु झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rishibah Pant:या दुखापतीमुळे पंतच्या उजव्या पायाला मोठी सूज आली आहे. तसंच रक्तंही आलं.
मुंबई:

India vs England Live Score, 4th Test Match Day 1: अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी सीरिजमधील चौथी टेस्ट मँचेस्टरमध्ये सुरु झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा विकेट किपर-बॅटर ऋषभ पंत जखमी झालाय. ख्रिस वोक्सच्या बॉलवर रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बॉल पंतच्या पायला लागला.

या दुखापतीमुळे पंतच्या उजव्या पायाला मोठी सूज आली आहे. तसंच रक्तंही आलं. त्यााला पायावर उभारणेही कठीण होत होतं. त्यामुळे त्याला ॲम्बुलन्सने मैदानाबाहेर नेण्यात आले. पंतला तिसऱ्या टेस्टमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे त्या टेस्टमध्ये ध्रुव जुरेलनं बराच काळ विकेट किपिंग केली होती. 

त्यापूर्वी साई सुदर्शनने त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील पहिली हाफ सेंच्युरी झळकावली. सुदर्शननं 134 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. हाफ सेंच्युरीनंतर सुदर्शन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो 61 रन्स काढून आऊट झाला.  

Advertisement

( नक्की वाचा : Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालनं रचला इतिहास! 50 वर्षांनंतर 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय )

टीम इंडियानं दुसऱ्या सेशनमध्ये 3 विकेट्स गमावल्या. केएल राहुल (46), जयस्वाल (58) आणि गिल (12) धावा काढून बाद झाले. पहिल्या सेशनमध्ये भारताने कोणतीही विकेट न गमावता 78 रन्स केले होते. या टेस्टमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया तीन बदलांसह मैदानात उतरली आहे. करुण नायरच्या जागी साई सुदर्शनचा समावेश करण्यात आला आहे. जखमी आकाश दीप आणि रेड्डी यांच्या जागी कंबोज आणि शार्दुलला संधी मिळाली आहे.

भारतासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. या सामन्यात पराभव झाल्यास मालिका जिंकण्याचे त्याचे स्वप्न भंगेल. तर प्रतिस्पर्धी इंग्लंड संघाचा प्रयत्न हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा असेल.

Advertisement
Topics mentioned in this article