जाहिरात

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालनं रचला इतिहास! 50 वर्षांनंतर 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय

India vs England : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट मँचेस्टरमध्ये सुरु आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वालनं (Yashasvi Jaiswal) इतिहास रचला आहे.

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालनं रचला इतिहास! 50 वर्षांनंतर 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय
Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालनं इंग्लंडमध्ये नवा इतिहास रचला आहे.
मुंबई:

India vs England : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथी टेस्ट मँचेस्टरमध्ये सुरु आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जयस्वालनं (Yashasvi Jaiswal) इतिहास रचला आहे. यशस्वीनं मँचेस्टरमध्ये 58 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानं या टेस्टमध्ये हाफ सेंच्युरी झळकावताच त्यानं रेकॉर्ड केला आहे.

गेल्या ५० वर्षांत कोणत्याही भारतीय सलामीवीराने मँचेस्टरच्या ओल्ड ट्र्ॅफर्डवर केलेले पहिले अर्धशतक आहे. यापूर्वी महान बॅटर सुनील गावस्कर यांनी 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध याच मैदानावर 58 रन्स केले होते. आता बरोबर 50 वर्षांनंतर, जायसवालने त्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली आहे. 

( नक्की वाचा : Who is Anshul Kamboj: मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण करणारा अंशुल कंबोज कोण आहे? कुणाला मोडता न येणारा केलाय रेकॉर्ड! )

वेग, स्विंग आणि बाऊन्सनं भरलेल्या ओल्ड ट्रॅफर्डच्या खेळपट्टीवर अर्धशतक करणे कोणत्याही बॅटरसाठी आव्हानात्मक असते. जयस्वालची ही खेळी टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून देण्यात खूप उपयुक्त ठरली. मात्र, हा विक्रम आपल्या नावावर केल्यानंतर जायसवाल 58 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि भारताला दुसरा धक्का बसला.

यशस्वी आणि केएल राहुल यांनी या टेस्टमध्ये टीम इंडियाला चांगली सुरुवात केली होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 94 रन्सची पार्टनरशिप केली. राहुल हाफ सेंच्युरी झळकावण्यात अपयशी ठरला. तो 46 रन्स काढून आऊट झाला. कॅप्टन शुबमन गिललं या मॅचमध्ये फारशी कमाल करता आली नाही. तो 12 रन्स काढून आऊट झाला.

टीम इंडियानं या टेस्टमध्ये तीन बदल केले आहेत. करुण नायर, नितीश कुमार रेड्डी आणि आकाशदीपच्या जागी साई सुदर्शन, शार्दूल ठाकूर आणि अंशुल कंबोजचा समावेश करण्यात आला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्टच्या सीरिजमध्ये टीम इंडिया सध्या 1-2 नं पिछाडीवर आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com