India vs England 1stODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच 6 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी एक अजब प्रसंग घडला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ टीम इंडियाचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूचा (Team India's Throwdown Specialist Raghu Viral Video) आहे.
रघूला टीमच्या बसमध्ये चढण्यापूर्वी पोलिसांनी पकडलं आणि त्याची चौकशी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वास्तविक टीम इंडियाचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूला पोलिसांनी ओळखलं नाही. तो त्यांना टीम इंडियाचा फॅन वाटला. त्यामुळे त्यांनी त्याला बसमध्ये जाण्यापासून रोखलं. पोलिसांनी थांबल्यानं रघूला देखील धक्का बसला होता.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वन-डे सीरिज होत आहे. टीम इंडियानं टी20 सीरिजमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतानं ही सीरिज 4-1 नं जिंकली. आता भारतीय वन-डे टीमचंही चांगली कामगिरी करण्याचं लक्ष्य आहे.