जाहिरात

IND vs ENG: नागपूरमध्ये टीम इंडियाच्या सदस्याला पोलिसांनी पकडलं, Video Viral

IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच 6 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी एक अजब प्रसंग घडला.

IND vs ENG: नागपूरमध्ये टीम इंडियाच्या सदस्याला पोलिसांनी पकडलं, Video Viral
मुंबई:

India vs England 1stODI : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली वन-डे मॅच 6 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी एक अजब प्रसंग घडला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ टीम इंडियाचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूचा (Team India's Throwdown Specialist Raghu Viral Video) आहे. 

रघूला टीमच्या बसमध्ये चढण्यापूर्वी पोलिसांनी पकडलं आणि त्याची चौकशी केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वास्तविक टीम इंडियाचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघूला पोलिसांनी ओळखलं नाही. तो त्यांना टीम इंडियाचा फॅन वाटला. त्यामुळे त्यांनी त्याला बसमध्ये जाण्यापासून रोखलं. पोलिसांनी थांबल्यानं रघूला देखील धक्का बसला होता. 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वन-डे सीरिज होत आहे. टीम इंडियानं टी20 सीरिजमध्ये जबरदस्त कामगिरी केली. भारतानं ही सीरिज 4-1 नं जिंकली. आता भारतीय वन-डे टीमचंही चांगली कामगिरी करण्याचं लक्ष्य आहे. 

( नक्की वाचा : Vinod Kambli विनोद कांबळीला घटस्फोट देणार होती पत्नी, निर्णय बदलण्याचं कारण वाचून वाटेल अभिमान )
 

टीम इंडियात नवा चेहरा दाखल

दरम्यान टी20 सीरिजमधील दमदार कामगिरीनंतर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीचा (Varun Chakravarthy) वन-डे सीरिजमधील टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 सीरिजमध्ये वरुणनं 14 विकेट्स घेतल्या होत्या. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव हे तीन प्रमुख स्पिनर सध्या दुखापतीमधून सावरत आहेत. त्यामुळे वरुणचा ऐनवेळी झालेला समावेश महत्त्वाचा मानला जात आहे. 

19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होणारी भारतीय टीमची ही शेवटची सीरिज आहे. त्यामुळे या सीरिजकडं भारतीय फॅन्सचं विशेष लक्ष्य आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा (पहिल्या दोन वन-डे) जसप्रीत बुमराह (फक्त तिसरी वन-डे), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: