जाहिरात

Vinod Kambli विनोद कांबळीला घटस्फोट देणार होती पत्नी, निर्णय बदलण्याचं कारण वाचून वाटेल अभिमान

Vinod Kambli's wife Andrea Hewitt : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचं वैयक्तिक आयुष्य सध्या चांगलंच चर्चेत आहे.

Vinod Kambli  विनोद कांबळीला घटस्फोट देणार होती पत्नी, निर्णय बदलण्याचं कारण वाचून वाटेल अभिमान
मुंबई:

Vinod Kambli's wife Andrea Hewitt : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचं वैयक्तिक आयुष्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी बॉलर्सची धुलाई करणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाबद्दल संपूर्ण देशाला काळजी वाटत आहे. विनोदची खराब तब्येत हे त्याचं मुख्य कारण आहे. खराब तब्येत आणि नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे विनोदबद्दल क्रिकेट फॅन्स सतत काळजी व्यक्त करत असतात.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वैयक्तिक आयुष्यात आलं होतं वादळ

विनोद कांबळीच्या आयुष्यात आणखी एक मोठं वादळ येणार होतं. कांबळीची बायको अँड्रिया हेविटनंच हा खुलासा केला आहे. 'आपण विनोदपासून घटस्फोट घेणार होतो. 2023 साली घटस्फोटाची केस देखील दाखल केली होती,' असा खुलासा अँड्रियानं केला आहे. विनोदची असहाय्य अवस्था पाहून आपण हा निर्णय रद्द केला, असं तिनं सांगितलं. 

अँड्रिया हेविट ही विनोद कांबळीची दुसरी बायको आहे. या दोघांनी 2006 साली एका खासगी कार्यक्रमात सिव्हिल कोर्टमध्ये लग्न केलं होतं.  विनोद कांबळीची तब्येत गेल्या महिन्यात खालावली होती. त्याला 21 डिसेंबर रोजी ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

( नक्की वाचा : 'चक दे इंडिया' गाण्यावर नाचला विनोद कांबळी, हॉस्पिटलमध्येही जोश कायम, Video )
 

मुक्त पत्रकार सुर्यांशी पांडे यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये अँड्रियानं सांगितलं की,  आपण विनोदला सोडण्याच्या विचार करत होतो. पण, मला सतत त्याच्या तब्येतीची काळजी वाटक असे. 

'मी सोडलं असतं तर तो हतबल झाला असता. तो लहान मुलासारखा आहे. त्यामुळे मला त्रास होतो. मला त्याची काळजी वाटते. मी कधी मित्रालाही सोडणार नाही. पण, तो त्यापेक्षा जास्त आहे. एक काळ असा होता की तेव्हा मला वाटले होते की मी निघून जाईन. पण, मला त्याची काळजी होती. त्यानं काही खाल्लं की नाही? तो त्याच्या बेडवर व्यवस्थित आहे का? तो बरा आहे का? ही चिंता मला सतत सतावत असे. त्यानंतर मी त्याच्यावर लक्ष ठेवू लागले. त्यावेळी माझी त्याला गरज आहे, हे जाणवलं.' असं तिनं सांगितलं. 

( नक्की वाचा : सचिन, लारा, विराटसह कुणालाही मोडता आला नाही विनोद कांबळीचा हा रेकॉर्ड )
 

विनोद कांबळी नुकताच वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात दिसला होता. तो गेल्या काही दिवसांपासून निरनिराळ्या आजरांनी ग्रस्त आहे. त्याला डिसेंबर महिन्या 'ब्रेन क्लॉट' झाल्यानं ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 

विनोदला काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर वानखेडे स्टेडियमममध्ये झालेल्या कार्यक्रमात तो पत्नी अँड्रियाच्या मदतीनं चालताना दिसला होता. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: