जाहिरात

IND vs ENG : पाचव्या दिवशी टेन्शन वाढलं, गिल, राहुल संतापले, तर जडेजानं अंपायरसमोर....

India vs England 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाचे खेळाडू चांगलेच संतापले होते.

IND vs ENG : पाचव्या दिवशी टेन्शन वाढलं, गिल, राहुल संतापले, तर जडेजानं अंपायरसमोर....
मुंबई:

India vs England 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्टच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाचे खेळाडू चांगलेच संतापले होते. इंग्लंडसमोर ही टेस्ट जिंकण्यासाठी 371 रन्सचं टार्गेट आहे. पाचव्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या ओपनर्सनी चांगली सुरुवात केली. बेन डकेट आणि झॅक क्रॉली हे सलामीवीर भारतीय बॉलर्सना दाद देत नव्हते. याबाबत  टीम इंडियानं वारंवार केलेली विनंती अंपायरनं नाकारली. त्यामुळे भारतीय खेळाडू चांगलेच संतापले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी अंपायर ख्रिस गॅफनी आणि पॉल रीफेल यांना वारंवार बॉल बदलण्याची विनंती केली. बॉलचा आकार बदलला आहे, असं टीम इंडियाचं मत होतं. पण, त्याला अंपायर्सनी दाद दिली नाही. त्यामुळे कॅप्टन शुबमन गिलं, के. एल. राहुल, शार्दुल ठाकूर हे सर्वजण निराश झाले होते. 

( नक्की वाचा : Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालनं इतिहास घडवला, सचिन, रोहित, विराटलाही जमलं नाही ते केलं! )

अखेर, बॉल गेज टेस्टमध्ये निकामी ठरला आणि तो बदलण्यात आला. त्यानंतर लगेचच टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा एका अंपायरसमोर गेला आणि त्यानं मूठ आवळून आनंद व्यक्त केला. पहिल्या इनिंगमध्येही भारतीय खेळाडू बॉलच्या आकारावर नाराज झाले होते. 

पाचव्या दिवशी सकाळी इंग्लिश सलामीवीरांनी भारतीय बॉलर्सना चांगलंच तंगवले. बेन डकेटनं शेवटच्या दिवशी सेंच्युरी झळकावली. तर झॅक क्रॉलीनं हाफ सेंच्युरी झळकावली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 188 रन्सची पार्टनरशिप केली. प्रसिध कृष्णानं क्रॉलीला (65) आऊट करत टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com