India vs Pakistan Live Streaming: भारत-पाकिस्तानचा सामना Live कुठे पाहाल? सोनी नेटवर्कशिवाय कोणता पर्याय?

India vs Pakistan Asia Cup 2025 : आशिया कप (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सुपरहिट सामना आज रविवार, 14 सप्टेंबर रोजी दुबईत खेळला जाणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
India vs Pakistan Live Streaming Live Telecast How To Watch

India vs Pakistan Asia Cup 2025: आशिया कप (Asia Cup 2025) मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सुपरहिट सामना आज रविवार, 14 सप्टेंबर रोजी दुबईत खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. वर्षातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेपैकी हा सामना असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी क्रीडा चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जेव्हा जेव्हा आयोजित केला जातो, त्यावेळी क्रीडा चाहत्यांबरोबरच भारतीयांचा उत्साह शिगेला असतो. (Live streaming and TV broadcast details for India vs Pakistan clash )

आशिया कप 2025 चे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स, डीडी फ्री डिश आणि दूरदर्शन नॅशनल टीव्हीवर उपलब्ध असेल? (Is Asia Cup 2025 Live Telecast Available on DD Sports, DD Free Dish and Doordarshan National TV?)

सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आशिया कप 2025 च्या प्रसारणाचा अधिकार आहे. हा केबल टीव्ही किंवा डीटीएचवर उपलब्ध असेल. तर आशिया कप 2025 चा थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्सवरही उपलब्ध असेल. मात्र केवळ भारताचे सामने डीडी फ्री डिशवर पाहू शकता. आशिया कप 2025 चा अंतिम सामना डीडी फ्री डिश वापरकर्त्यांसाठी डीडी स्पोर्ट्स चॅनलवर उपलब्ध असेल. 

नक्की वाचा - IND vs PAK: 'क्रिकेटपटूंची देशभक्ती कुठे गेली?'; वीर पत्नीचा सवाल, भारत-पाकिस्तान मॅचवर बहिष्काराचं आवाहन

फॅन कोडवरही पाहू शकता सामने..

आशिया कपचे सामने तुम्ही फॅन कोडवरही पाहू शकता. हा अॅप डाऊनलोड करून तुम्ही सामन्याची मजा घेऊ शकता. जर तुम्हाला एक सामना पाहायचा असेल तर यासाठी तुम्हाला 25 रुपये खर्च करावे लागतील. तर संपूर्ण आशिया कप पाहण्यासाठी 189 रुपये खर्च करु पॅकेज घ्यावं लागेल. 

Advertisement

आशिया कपसाठी भारत आणि पाकिस्तान संघात कोण कोण असेल? 

भारत
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.

पाकिस्तान
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम

Advertisement