Team India Victory Parade : T20 विश्व कप विजेता भारतीय क्रिकेट टीमचा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला. मुंबईकरांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. क्रिकेट फॅन्सचं प्रेम पाहून सर्वच खेळाडू भारावून गेले होते.
'त्या रात्री (2011 साली वर्ल्ड कप विजयानंतर ) सीनियर इतके इमोशनल का झाले होते, हे मला कळालं नव्हतं. आज ते समजतंय. रोहित शर्मालाही 15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतकं इमोशनल झालेलं मी पाहिलं', असं विराट कोहलीनं सांगितलं.
'आमचं स्वागत करण्यासाठी फॅन्स मोठ्या संख्येनं इथं आले आहेत. त्यांना T20 वर्ल्ड कप किती तीव्रतेनं हवा होतं, हेच यातून सिद्ध होतं. ही वर्ल्ड कप ट्रॉफी संपूर्ण देशाची आहे, अशी भावना टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं वानखेडे स्टेडियमवरील सत्कारात बोलताना व्यक्त केली.
मुंबईकरांनी टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत केलं. हजारो मुंबईकर भारतीय खेळाडूंचं अभिनंदन करण्यासाठी मरिन ड्राईव्हवर जमले होते.
मुंबईतील मरिन ड्राईव्हवर टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. T20 वर्ल्ड कप विजेत्या टीममधील सर्व खेळाडू क्रिकेट फॅन्सना अभिवादन करत आहेत. आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रत्यक्ष पाहताना मुंबईकरांच्या उत्साहाला उधाण आलंय.
भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी प्रचंड संख्यने जमलेल्या उत्साही क्रिकेट प्रेमींची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर आगमन झालं आहे. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात भारतीय टीम मुंबईत दाखल झाली आहे.
टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांच्या उत्साहाला उधाण आलंय. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी विमानतळ ते वानखेडे स्टेडियमपर्यंत मुंबईकरांनी गर्दी केली आहे. ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम देखील क्रिकेट फॅन्सनी भरलं आहे.
T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट टीमची विजयी मिरवणूक मुंबईत निघणार आहे. मरिन ड्राईव्ह ते वानखेडे अशी जवळपास दोन किलोमीटर ही मिरवणूक निघेल. भारतीय टीमची विजयी मिरवणूक तुम्हाला 'NDTV मराठी' वर पाहाता येईल.
बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'नमो 1' जर्सी भेट दिली.
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीसाठी ओपन डेक बस सज्ज
टीम इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचे क्षण
टीम इंडिया दिल्ली विमानतळाकडे रवाना
- टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीसाठी ओपन बस सज्ज
- खास गुजरात राज्यातून आणली ओपन बस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईकडे रवाना
एमसीएचे सचिव आणि अन्य पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. वानखेडे स्टेडिअममध्ये टीम इंडियासाठी होणाऱ्या कार्यक्रमाबाबतच्या आणि सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या. सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी वानखेडे स्टेडिअमला दिली भेट.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी टीम इंडिया दाखल
मुंबईतील टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक म्हणाले की, "एमसीएने चाहत्यांसाठी मोठी तयारी केली आहे. मुंबई पोलीस आणि बीसीसीआयच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्या यानुसार विनामूल्य प्रवेश देणार आहोत.मुंबई पोलिसांसोबत एक बैठक घेतली आहे. आज भारतीय संघाचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे".
भारतीय क्रिकेट टीम ITC मौर्य हॉटेलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी रवाना
आयटीसी मौर्य हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दी
विराट कोहली, हार्दिक पांड्यानेही केक कापून विजय केला साजरा
टीम इंडिया आहे सर्वात महान - सुधीर चौहान, चाहता
मरीन डाईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात जोरदार तयारी सुरू आहे.
कॅप्टन रोहित शर्मानंही साजरा केला जल्लोष
भारतीय क्रिकेट टीमचे कोच राहुल द्रविडने दिल्लीतील ITC मौर्य येथे केक कापून T20 वर्ल्ड कपचा विजय केला साजरा
बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष रॉजर बिन्नी, कॅप्टन रोहित शर्मासह टीम इंडिया लवकरच ITC मौर्य येथून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी रवाना होणार आहे.
कॅप्टन रोहित शर्मानेही केला डान्स
दिल्लीमध्ये पोहोचताच सूर्या कुमारने ढोलताशांवर धरला ठेका
कॅप्टन रोहित शर्माने विजयी मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी चाहत्यांनाही दिले निमंत्रण
हार्दिक पांड्याच्या डान्सने जिंकले चाहत्यांचे मन
टीम इंडियाचे खेळाडू दिल्लीत दाखल झाल्यानंतर आयसीसीनेही शेअर केले फोटो
विराट कोहलीने कुटुंबीयांची भेट घेतली
ITC मौर्य हॉटेलमध्ये विराट कोहलीचे कुटुंब दाखल
आयटीसी मौर्य हॉटेलच्या शेफने तयार केला खास केक
चाहत्यांनी 'भारत माता की जय' अशी घोषणाबाजी करत टीम इंडियाचे स्वागत केले
दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये टीम इंडियाचे हार्दिक स्वागत