IPL 2024 : कोलकाताने 10 वर्षानंतर पटकावलं आयपीएलचं जेतेपद, हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव

IPL 2024च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल दहा वर्षांनंतर आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

IPL 2024च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव केला. तब्बल दहा वर्षांनी कोलकाताने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. सनरायझर्स हैदराबादने दिलेलं किरकोळ 114 धावांचं लक्ष्य कोलकाताने 18.3 षटकांमध्ये पूर्ण केलं. 

कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे. याआधी कोलकाताने 2012 आणि 2014 साली आयपीएल चषक उंचवला होता.  कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक नाबाद 52 धावांची अर्धशतकीय खेळी केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सनरायझर्स हैदराबादने फायनल सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हैदराबादचा हा निर्णय कोलकाताच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. कारण कोलकाताच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादच्या खेळाडूंचा निभाव लागू शकला नाही. हैदराबादचा संघ महत्त्वाच्या सामन्यात अवघ्या 113 धावांवर ऑलआऊट झाला.

(नक्की वाचा: Natasha Stankovic : 'कुणीतरी रस्त्यावर...' घटस्फोटाच्या चर्चेत हार्दिकच्या पत्नीच्या पोस्टनं खळबळ)

हैदराबादच्या फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा अंदाज यावरुन लावता येईल की सात फलंदाजांना धावांचा दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. हैदराबादकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 24 धावा केल्या.  त्यानंतर मारक्रमने 20, क्लासेने 16, नितीश रेड्डीने 13 धावा केल्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर स्टार्क आणि हर्षित राणाने प्रत्येकी दोन, वैभव आरोरा, सुनील नारायण आणि वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

Advertisement

हैदाराबादने दिलेल्या 114 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताकडून व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 52 धावा कुटल्या. गुरबाजने 39, सुनील नारायणने 6 तर कर्णधार श्रेयस अय्यरने देखील 6 धावा केल्या.

( नक्की वाचा : T20 World Cup : रोहित आणि आगरकरच्या मनाविरुद्ध झाली हार्दिक पांड्याची निवड! )

IPL 2024 | एकतर्फी मॅच, कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला IPL 2024 चा कप  

Topics mentioned in this article